भूतान हा असा एक देश आहे, जिथे विकासाचे मोजमाप हे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस म्हणजेच GNH द्वारे केले जाते. भूतानला ‘लँड ऑफ थंडर ड्रॅगन’म्हणून देखील ओळखलं जातं.भूतानचा मुख्य धर्म बौद्ध आहे.भूतानला बौद्ध धर्म हा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाच्या रूपानं मिळालेला आहे. बौद्ध धर्मासोबतच भूतानमध्ये हिंदू, ईसाई, मुस्लीम आणि बॉन समाजाचे देखील लोक वास्तव्य करतात. लोकसंख्येच्या दृष्टीनं भूतान हा एक छोटा देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त 7.5 लाख इतकीच आहे.
यातील बहुतांश नागरिक है बौद्ध धर्माचे पालन करतात. भूतानमध्ये रहाणारे 75 टक्के लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. तर 25 टक्के लोक हे इतर धर्माचे हिंदू, मुस्लिम, इसाई आणि बॉन समाजाचे आहेत.भूतानमध्ये हिंदू धर्माच्या नागरिकांची संख्या 22.6 टक्के एवढी आहे. भूतानमध्ये बौद्ध आणि हिंदू समाज जास्त असल्या कारणामुळे या देशात अनेक जुनी मंदिरं आणि बौद्ध धर्मीयांची प्रार्थना स्थळे आढळून येतात.
भूतानवर निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केली आहे. येथीन नैसर्गिक सौंदर्यासाठी भूतान जगभरात ओळखला जातो. येथील अर्थव्यवस्था देखील पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हे भूतानला भेट देत असतात. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत असतात. भूतानमध्ये मोठ्या संख्येनं बौद्ध धर्मीय लोक राहातात, भूतान देशाची तब्बल 75 टक्के लोकसंख्या ही बौद्ध धर्म मानणारी आहे. तर 22.6 टक्के एवढे हिंदू आहेत. त्यामुळे इथे बौद्ध मंदिरे आणि हिंदू मंदिरे मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात
मात्र भारताच्या शेजारी असलेल्या या देशात मुस्लीम धर्मीय देखील आहेत. भूतानमध्ये मुस्लीम धर्मीयाची लोकसंख्या सात हजारांच्या आसपास आहे मात्र भूतान हा जगातील तिसरा आणि भारताच्या शेजारचा असा एकमेव देश आहे, जिथे एक देखील मशीद नाहीये.भूतान व्यतिरीक्त मोनाको आणि स्लोवाकिया असे दोन देश आहेत, ज्या देशामध्ये देखील एकही मशिद नाही. मशिद नसल्यामुळे भूतानमधील मुस्लीम लोक आपल्या घरातच नमाज अदा करतात.