मुंबई : भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार आहे. फ्रान्समधून 3 राफेल लढाऊ विमान बुधवारी रात्री 10.30 वाजता जामनगर एअरबेसवर उतरणार आहेत. भारतीय वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. राफेल विमानांचा नवा ताफा भारतात दाखल झाल्यानंतर भारतीय वायू सेनेची ताकद अजून वाढणार आहे. (3 Rafale fighter jets take off from France, arriving in India late at night)
भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात सध्या 11 राफेल विमानं आहेत. आता 3 विमाने दाखल झाल्यानंतर ही संख्या 14 होणार आहे. भारताला पुढील काही दिवसात अजून 10 राफेल विमानं मिळणार आहेत. भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात सध्या असलेले 11 राफेल विमान अंबालामध्ये 17 स्क्वॉड्रनसोबत उड्डाण भरत आहेत. राफेल विमानांना चीनसोबत सुरु झालेल्या वादावेळी पूर्व लडाख आणि अन्य मोर्चांवर गस्तीसाठी तैनात करण्यात आलं होतं.
#WATCH: Glimpses of another batch of Rafale which took off to the skies!
(Source: Embassy of India in France) pic.twitter.com/1KeUPZeH0j
— ANI (@ANI) March 31, 2021
भारत आता स्वरेशी रुपानं विकसित स्टेल्थ फायटर्स एडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्टसह 114 मल्टीरोल लढाऊ विमानांची ऑर्डर देणार आहे.
चीनसोबत सुरु असलेल्या सीमा विवादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायूसेनेची ताकद वाढणार आहे. आज तीन राफेल लढाऊ विमान रात्री उशिरा एअरबेसवर लँड करणार आहेत.
हे तीन लढाऊ राफेल फ्रान्सवरुन भारतात 7 हजार किलोमीटर अंतर कापून येणार आहेत. UAEच्या आकाशातच या तिनही विमानांमध्ये इंधन भरलं जाणार आहे.
Another batch of Rafale take to the skies on non-stop flight to India with mid-air refueling by UAE: Embassy of India in France pic.twitter.com/dBMkaF02gF
— ANI (@ANI) March 31, 2021
संबंधित बातम्या :
Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!
3 Rafale fighter jets take off from France, arriving in India late at night