डोकं दुखू लागलं, जमीवर कोसळून तडफडू लागला… जिममध्ये व्यायाम करणाऱ्या 32 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू, CCTV मध्ये थरारक घटना कैद

| Updated on: May 02, 2024 | 10:32 AM

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका जिममध्ये व्यायाम करत असलेल्या 32 वर्षीय तरुणाचा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झाला. हा तरुण जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला डोकेदुखीचा त्रास झाला आणि तो जमिनीवर पडला. यानंतर इतर लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

डोकं दुखू लागलं, जमीवर कोसळून तडफडू लागला...  जिममध्ये व्यायाम करणाऱ्या 32 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू, CCTV मध्ये थरारक घटना कैद
Follow us on

जिममध्ये व्यायाम करणाऱ्या अवघ्या 32 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये घडली. यामुळे एकच खळबळ माजली आहे. वाराणसी शहरातील सिद्धगिरी भागात 32 वर्षीय युवक हा जिममध्ये व्यायाम करत होता. मात्र अचानक तो डोकं धरून काली पडला आणि तडफडू लागला. जिममधील इतर लोकांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. ही दुर्दैवी घटना त्या जिममधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दीपक गुप्ता असे मृत तरूणाचे नाव असून वाराणसीच्या चेतगंज भागातील पियारी भागात राहयाचा, तो बॉडी बिल्डिंग करायचा. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे  शहरातील सिद्धगिरी बाग परिसरात असलेल्या जिममध्ये सकाळी व्यायामासाठी आला होता. मात्र व्यायाम करत असतानाच अचानक त्याचं डोक दुखायला लागला आणि तो डोकं धरूनच खाली बसला.

खाली बसल्यानंतर काही क्षणातच तो खाली कोसळला आणि तडफडू लागला. दीपक जमीनीवर पडल्याचे पाहून जीममध्येच व्यायाम करणाऱ्या इतर लोकांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. ही घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाली आहे. उपस्थित लोकांनी दीपकला तातडीने महमूरगंज भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले. व्यायामानंतर दीपकला ब्रेनस्ट्रोकचा त्रास झाला असे समजते. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत. दीपकच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सर्व परिवार शोकाकुल आहे.