उत्तराखंड | 15 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंडातील बोगद्यातील भुस्खलन झाल्याने 40 मजूर चार दिवसांपासून बोगद्यात अडकलेलेच असून त्यांच्या बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुच आहे. या मजूरांच्या प्रयत्न ऑक्सीजन आणि अन्न पोहचविले जात आहे. त्यांच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीमने आता एक्सपर्ट टीमची मदत मागितली आहे. आता या मजूरांच्या सुटकेसाठी दिल्ली मेट्रो, नॉर्वे आणि थायलंडच्या तज्ज्ञांशी बातचीत केली असून त्यांच्या सल्ला घेतला जात आहे. ऐन दिवाळीत शनिवारी 11 नोव्हेंबर रोजी पहाटे उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावरील सिलक्यारा ते डंडालगांवच्या भुयारी मार्गाचे काम सुरु असताना बोगद्यात भुस्खलन होऊन आत मजूर अडकले आहेत.
ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारा ते डंडालगांव या रस्त्याचे काम सुरु आहे. या भागातील बोगद्याचे काम नवयुगा कंपनीमार्फत सुरु असताना अचानक भूस्खंलन होऊन 50 मीटरचा बोगद्याचा भाग आत कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे बोगद्यात काम करणारे 36 ते 40 मजूर आतमध्ये अडकले गेले आहेत. या मजूरांना बाहेर काढण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून बचाव मोहीमेचे काम सुरु आहे. बचाव पथकाने आता थायलंड आणि नॉर्वे येथील आंतराष्ट्रीय संघटनांशी संपर्क केला आहे. त्यांच्याकडून टनेलमधील रेस्क्यू करण्याचा अनुभवाची माहीती शेअर केली जात आहे. रेस्क्यू टीमने नॉर्वे येथील एनजीआय आणि थायलंड येथील युटिलिटी टनलिंग सोबत बातचीत केली आहे. तसेच दिल्ली मेट्रो रेल्वेच्या तज्ञ्जांची देखील मदत घेतली जाद आहे.
बोगद्यात अडकलेल्या मजूरांसाठी पाणी, जेवण, ऑक्सिजन आणि वीज पुरवठा केला जात आहे. पाईपमधून जेवणाची छोटी पाकिटे पाठवली जात आहे. आत अडकलेले सर्व मजूर सुरक्षित आहेत. मजूरांच्या सुटकेसाठी दिल्ली मेट्रोची मेट्रोची हाय पॉवर ड्रिलींग मशिन आणण्यात येत आहे. नवी दिल्लीतील वायू सेनेच्या एअरपोर्टवरुन ही मशीन हेलिकॉप्टरने चिन्यालीसौंड हेलीपॅड पर्यंत आणली जात आहे. त्यानंतर तिची घटनास्थळी स्थापन करुन काम सुरु केले जाणार आहे.