मुंबई | 3 जानेवारी 2023 : वंदेभारत एक्सप्रेस या आधुनिक आणि वेगवान ट्रेनमुळे तिला चांगले यश मिळत आहे. आता 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून अमृत भारत एक्सप्रेसची भेट देखील दिली आहे. पंतप्रधानांनी एकाच वेळी दोन नवीन ट्रेनची भेट प्रवाशांनी दिली आहे. वंदेभारतचे तिकीट दर जादा असल्याने सर्वसामान्यांसाठी अमृत भारत ही कमी तिकीट दराची ट्रेन प्रवाशांना मिळाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकार दरवर्षी 300 ते 400 अमृत भारत एक्सप्रेस चालविणा असल्याचे म्हटले आहे. या रेल्वेच्या विविध कंपन्यांच्या स्टॉकमध्ये उसळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलिकडेच रेल्वेच्या विविध कंपन्यांनी शेअर बाजारात चांगली उसळी मारली आहे. आता सरकारतर्फे देशातंगर्त निर्मित वंदेभारत आणि अमृत भारत सारख्या ट्रेनच्या सहभागामुळे रेल्वे कंपन्यांच्या शेअरना चांगली मागणी वाढणार आहे. या कंपन्यामध्ये तितागढ रेल सिस्टीम्स, इरकॉन इंटरनॅशनल, आयएआरएफसी, रेल विकास निगम, बीईएमएल, रेलटेल, कंटेनर कॉर्प ऑफ इंडीया, आरआयटीईएस, आयआरसीटीसी आदी कंपन्यांचा समावेश आहे.
गेल्या 9.5 वर्षांत रेल्वे नेटवर्कचा विस्तार 26 हजार किमी इतका झाला आहे. तसेच रेल्वेने 30,749 कोटी रुपये खर्च करून रेल्वे मार्गांचे दुपदरी करण केले असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. अमृत भारत स्टेशन प्रकल्पांतर्गत 400 रेल्वे स्थानकांचा पुर्विकास करण्यात येत आहे. या स्थानकात आधुनिक सुविधा आणि पार्किंगची सुविधा वाढविली जात आहे. अमृत भारत एक्सप्रेस एक स्लीपर क्लास ट्रेन आहे. या ट्रेनचे भाडे कमी असले तर सुविधा वंदेभारत सारख्या देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, जादा वेग आणि आरामदायी प्रवासाच्या सुविधा आहेत. या ट्रेनमुळे केवळ प्रवाशांच्या वेळेतच बचत होत नाही तर बाहेरील आवाज आणि हवा देखील कमी आत येते असे म्हटले जाते.
नरेंद्र मोदी सरकारने नऊ वर्षांत खूप बदल केला आहे. आधुनिक ट्रेनशिवाय नवीन ट्रॅक टाकणे, स्थानकांचे नुतनीकरण, रेल्वे मार्गांचे नुतनीकरण वेगाने होत आहे. रेल्वेने 14 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात 100 टक्के इलेक्ट्रीफिकेशचे ध्यैयाचे लक्ष्य 31 मार्च 2023 पर्यंत गाठले आहे. यामुळे भारताचा आयातीवरचे पैसे वाचतील आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल असे म्हटले जाते.