उत्तराखंड | 23 नोव्हेंबर 2023 : उत्तराखंडाती सिलक्यारा येथील बोगद्यात भूस्खलन होऊन 41 मजूरांना अडकून आज 12 दिवस झाले आहेत. आज मजूरांची सुटका होणार होती. परंतू ऑपरेशन थोडं लांबले आहे. येथील नोडल ऑफीसर नीरज खैरवाल यांनी सांगितले की सर्व मजूरांची तब्येत व्यवस्थित आहे. मेन्टल हेल्थ एक्सपर्ट सातत्याने त्यांच्याशी बोलत आहेत. बुधवारी 45 मीटरपर्यंत खोदकाम झाले होते. आज गुरुवारी सकाळपासून 1.8 मीटरची ड्रीलिंग झाली आहे. आतापर्यंत एकूण 46.8 मीटरचे ड्रीलिंग संपले आहे. 12 ते 14 तास हे रेस्क्यू ऑपरेशन संपण्यासाठी लागणार आहेत. बाहेर 41 एम्ब्युलन्स सुज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मजूरांना बाहेर काढताच त्यांना स्ट्रेचरवरून थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे.
एकदाचा रेस्क्यू पाईप मजूरांपर्यंत पोहचला की एनडीआरएफची टीम एक-एक करून मजूरांना बाहेर काढणार आहे. एडीआरएफची 21 सदस्यांची टीम बाहेर उभी असणार आहे. त्यांच्याकडे ऑक्सिजन पॅक मास्क आणि चाकांची स्ट्रेचर आहे. आधी 800 मिलीमीटरचा रेस्क्यू पाईप एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम साफ करणार आहे. त्यात काही माती किंवा दगड राहू नयेत याची काळजी घेतली जाणार आहे.
मजूरांना काढण्यासाठी 800 मिमीचा रेस्क्यू पाईप पुरेसा असल्याचा एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी म्हटले आहे. 800 मिमी पाईपची रुंदी 32 इंच आहे. जर त्याची रुंदी जर 22 वा 24 इंच असती तरी आम्ही मजूरांना त्यातून बाहेर काढू शकलो असतो. आमच्या टीमने याची रिहर्सल देखील केली आहे.
मशीनमार्फत बोगद्याच्या आता एकूण 57 मीटर ड्रीलिंग करावी लागणार आहे. त्यास 60 मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. म्हणजे आणखी स्पेश मिळण्यास मदत होईल. स्टीलचा एक सहा मीटर लांबीचा आणखी एक पाईप टाकला जाणार आहे. म्हणजे संपूर्ण लांबी 60 मीटरपर्यंत होईल असे डीजी करवाल यांनी म्हटले आहे.
पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले की बुधवारी रात्री ड्रीलिंग करताना पोलादी स्ट्रक्चरमध्ये आल्याने ऑपरेशन थांबवावे लागले. सकाळी हा अडसर दूर करण्यात आला. त्यानंतर ड्रीलिंगचे काम पुन्हा सुरु झाले आहे. सर्वकाही सुरळीत सुरु राहीले तर येत्या 12 ते 14 तासांत मजूरांपर्यंत पोहचता येईल अशी माहीती भास्कर यांनी दिली. कमी उंचीच्या स्ट्रेचरवर मजूरांना झोपवून दूसऱ्या बाजूंनी रस्सीने खेचावे लागणार आहे. एकावेळी एक अशा पद्धतीने मजूरांना बाहेर काढावे लागणार आहे. या प्रक्रीयेला तीन तास लागणार आहेत. मजूर बाहेर आले की 41 एम्ब्युलन्स मधून त्यांना चिन्यालीसौड येथील कम्युनिटी सेंटरमध्ये 41 बेडच्या स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.