45 वर्षीय फिटनेस आयकॉनचा हार्टअटॅकने मृत्यू, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी वाहीली श्रद्धांजली

| Updated on: Feb 04, 2024 | 4:14 PM

दररोज 100 किलोमीटर सायकल चालविणाऱ्या सायकल पटू अनिल कडसूर यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनानंतर भाजपाचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी एक्स माध्यमावर श्रद्धांजली वाहीली आहे.

45 वर्षीय फिटनेस आयकॉनचा हार्टअटॅकने मृत्यू, भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी वाहीली श्रद्धांजली
cyclist Anil Kadsur
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

बंगळुरु | 4 फेब्रुवारी 2024 : व्यायाम आणि फिटनेसचे आयकॉन असलेल्या सायकलपटू अनिल कडसूर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अनिल कडसूर हे 45 वर्षांचे होते. दक्षिण बंगळुरु येथील सायकलपटू असलेल्या अनिल कडसूर यांनी अनेकांना फिट राहण्याची प्रेरणा दिली होती. अलिकडेच त्यांनी सलग 42 महिने दररोज 100 किमी सायकल चालविण्याचा विक्रम केला होता. त्यांच्या निधनानंतर भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करीत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

अनिक कडसूर हे दक्षिण बंगळुरु येथील प्रसिद्ध व्यक्तीमत्व होते. ते बंगळुरु शहारातील अनेक तरुणांचे फिटनेस आयकॉन होते. शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. 45 वर्षीय फिटनेस ट्रेनर अनिल कडसूर दररोज 100 किमी सायकल चालवायचे. त्यांनी सलग 42 महिने दररोज न चुकता 100 किमी सायकल चालविण्याचा विक्रम नुकताच केला होता. 31 जानेवारी रोजी त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत आपला अनोखा विक्रम शेअर केला होता. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने 2 फेब्रुवारीच्या सकाळी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

तेजस्वी सुर्या यांची पोस्ट येथे पाहा –

 

कडसूर यांच्या मृत्यूनंतर भाजपाचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी एक्स समाजमाध्यमावर पोस्ट टाकीत कडसूर यांना श्रद्धांजली वाहीली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, सायकलीस्ट अनिल कडसूर यांच्या मृत्यूची बातमी ऐकूण वाईट वाटले. त्यांनी गेले 1,500 दिवस सातत्याने 100 किमी दररोज सायकल चालविण्याचा विक्रम केला होता. ते दक्षिण बंगलुरु येथील प्रसिद्ध व्यक्तीमत्व होते. माझ्या सारख्या अनेक तरुणांचे ते फिटनेस आयकॉन होते. आम्ही सारख्या अनेक जण त्यांना शहरात सतत सायकल चालविताना पहायचो असे तेजस्वी सुर्या यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सलग 1000 दिवस दररोज 100 किमी सायकल चालविल्याने कडसूर प्रसिद्ध झाले होते. ते बंगळुरुच्या सायकलिंग कम्युनिटीचे आयकॉन झाले होते. सायकलिंगचा रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीने अनेकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे.