नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड व्यस्त असे एक वेळापत्रक आता समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांत म्हणजेच 24 आणि 25 एप्रिल रोजी मध्य भारतातून दक्षिण आणि नंतर पश्चिमेकडे प्रवास करणार आहेत. त्यानंतर दिल्लीला परतणार आहे. यावेळी पंतप्रधान अनेक कार्यक्रमामधून सहभागी होणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची ही सुरुवात मध्य प्रदेशातून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अथक आणि न थांबता काम करणारे नेते म्हणून संपूर्ण देश ओळखतो. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक समोर आले आहे.
24 आणि 25 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी वेगवेगळ्या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उत्तरेकडील दिल्लीपासून ते प्रथम मध्य भारतात म्हणजेच मध्य प्रदेशात प्रयाण करणार आहेत.
त्यानंतर ते दक्षिणेला केरळमध्ये पोहचणार आहेत. तर त्यानंतर पश्चिमेला दादर नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मुक्काम करणार आहेत.त्यानंतर ते थेट दिल्लीला परतणार आहेत. 36 तासांत पंतप्रधान सात शहरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 72 वर्षांचे आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्यकर्तृत्वाच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. 24 एप्रिल रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्यस्त वेळापत्रकासह प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
ते दिल्ली ते खजुराहो असा 500 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. तर खजुराहो येथून ते रेवा येथे जाणार आहेत. जेथे ते राष्ट्रीय पंचायती राज दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सुमारे 280 किलोमीटरचे अंतर कापून ते खजुराहोला परतणार आहेत.
युवम कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होण्यासाठी खजुराहो येथून ते कोची (केरळ) येथे विमानाने सुमारे 1700 किमी अंतर कापणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान कोची ते तिरुवनंतपुरम असा सुमारे 190 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
येथे ते वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. येथून ते सुरत (गुजरात) मार्गे सिल्वासा (दादरा आणि नगर हवेलीची राजधानी) येथे जाणार असूनते सुमारे 1570 किलोमीटरचे अंतर कापतील.
तेथे ते नमो मेडिकल कॉलेजला भेट देतील आणि विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्यानंतर ते देवका सीफ्रंटच्या उद्घाटनासाठी दमणला जातील, त्यानंतर ते सुरतपर्यंत सुमारे 110 किमीचा प्रवास करतील. सुरतहून ते 940 किमी असा प्रवास करून ते दिल्लीला परतणार आहेत.
नरेंद्र मोदी 36 तासांत 5300 किमीचा प्रवास करणार आहेत.पॉवर पॅक्ड शेड्यूलमध्ये, पंतप्रधान सुमारे 5300 किलोमीटरचा धक्कादायक हवाई प्रवास करतील.
पाहिले तर भारताची उत्तरेकडून दक्षिणेकडे लांबी सुमारे 3200 किमी आहे. हा संपूर्ण प्रवास अवघ्या 36 तासांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या या व्यस्त वेळापत्रकाची सर्वत्र चर्चा होत आहे.