Reliance AGM 2022 : स्वप्न दृष्टीक्षेपात..5G प्रत्यक्षात, मुकेश अंबानींची मोठी घोषणा..! कधीपासून होणार सेवा सुरु?

| Updated on: Aug 29, 2022 | 3:27 PM

5G सुरु झाल्यास आणखी एक क्रांती होईल असे सांगण्यात येत होते. आता ती प्रत्यक्ष वेळ जवळ येतानाचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक कंपन्या या स्पर्धेत उतरतील पण जिओचे वेगळेपण असेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलाय. कारण याचा वेग ब्रॉडबँडपेक्षाही अधिकचा राहणार आहे. कमी किंमतीत 5 जी ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Reliance AGM 2022 : स्वप्न दृष्टीक्षेपात..5G प्रत्यक्षात, मुकेश अंबानींची मोठी घोषणा..! कधीपासून होणार सेवा सुरु?
Mukesh Ambani
Follow us on

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून (5G बाबत चर्चा) सुरु आहे. यापूर्वी एअरटेलनेही ही सेवा याच वर्षात सुरु होणार असल्याचा दावा केला आहे तर आता या स्पर्धेत जिओनेही उडी घेतली आहे.  (Reliance Industries) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सोमवारी 45 वी सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये मुकेश अंबानी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवून उपस्थितांना संबोधित केले. या बैठकीत त्यांनी मोठी घोषणा केली असून लवकरच (Jio’s 5G service) जिओची 5G सेवा सुरु होणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिवाय त्रायाकरिता अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जिओने यापूर्वी इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती केली होती आता 5G सेवेचा धमाका ऐन दिवाळीत होणार असल्याचे मुकेश अंबाणी यांनी सांगितले आहे.

काय असणार आहेत वैशिष्ट्ये?

5G सुरु झाल्यास आणखी एक क्रांती होईल असे सांगण्यात येत होते. आता ती प्रत्यक्ष वेळ जवळ येतानाचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक कंपन्या या स्पर्धेत उतरतील पण जिओचे वेगळेपण असेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केलाय. कारण याचा वेग ब्रॉडबँडपेक्षाही अधिकचा राहणार आहे. कमी किंमतीत 5 जी ब्रॉडबँड सेवा देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यासोबतच कनेक्टेड सोल्यूशनही देण्यात येणार आहे. या माध्यमातून 100 दशलक्ष घरं जोडता येणार आहेत. कमी शुल्कामध्ये अधिक लाभ देऊन ग्राहकांच्या संख्येवर जिओचा भर आहे. जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान वापरले जाणार आहे जे एसए तंत्रज्ञानावर आधारित असेल. जिओची सेवा ही इतर कंपन्यासारखी नाहीतर स्टँडअलोन असणार आहे.

मेट्रो शहरांपासून श्रीगणेशा..!

जिओच्या 5G ची सेवा ही मुख्य शहरांमधून होणार आहे. या 5G च्या नेटवर्किंगसाठी तब्बल 2 लाख कोटींचा खर्च असणार आहे. शिवाय ही सेवा यंदाच्या दिवाळीपासून सुरु होणार आहे. एकदा सुरवात झाली की मात्र, डिसेंबर 2023 पर्यंत ही सेवा प्रत्येक शहरात असाणार असेही बैठकीत ठरवण्यात आले आहे. याकरिता कंपनी आवश्यक तिथे वायर आणि इतर ठिकाणी वायरलेस सेवेचा वापर करुन यंत्रणा उभारणार आहे. खासगी उद्योग, प्रायव्हेट कंपनी यांच्यासाठी देखील सेवा पुरवल्या जाणार आहेत. यामुळे नेटबाबतचा लोकांचा अनुभव बदलणार आहे. गेमिंगपासून स्ट्रीमिंग व्हिडिओपर्यंतची स्टाइल बदलणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.

अशी असणार सेवा

5G हे अगदी वायफाय सारखे कार्यरत राहणार आहे. हॉटस्पॉटप्रमाणे काम करेल तर याद्वारे युजर्संना 5 जी ब्रॉडबँड सेवा वापरता येणार आहे. जिओ एअरफायबरला आयपीएलचे सामने संवादात्मक पद्धतीने पाहता येणार आहेत. एकाच वेळी एकाधिक कॅमेरा अँगल थेट पाहणे सहज शक्य होणार आहे. युजर्संना स्वतःहून कॅमेरा अँगल निवडता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात उपस्थित राहून जो अनुभव घेता येणार नाही तो मोबाईलवर असणार आहे. 5G चे युजर्स जिओचा क्लाउड पीसी वापरू शकतात, ही प्रत्यक्षात एक क्लाऊड स्पेस असेल जी सामान्य वापरकर्त्यांकडून व्यावसायिक वापरकर्त्यांपर्यंत खरेदी केली जाईल.