India Unsolved Mysteries : कोलकाता येथील मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या ताब्यात देण्यात आली आहे. या तपास यंत्रणेला स्थानिक पोलिस तपास करण्यास अपयशी ठरले की पाचारण केले जाते. यात अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा समावेश आहे. असे अनेक प्रकरण आहेत. ज्यात सीबीआयला हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळे ही प्रकरणे वादात सापडली आहेत. अशा काही हायप्रोफाईल प्रकरणांचा धाडोंळा घेऊयात….
डे मर्डर केस (2011 ) – मिडचे पत्रकार ज्योतिर्मय डे यांची पवई परिसरात मारेकऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर अनेक जणांना अटक देखील झाली. तरीही संशय कायम आहे की खरेच गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे का ?
अनुराधा बाली (फिज़ा) मर्डर केस (2012)- अनुराधा बाली, ज्यांनी त्यांचे नाव बदलून फ़िज़ा असे ठेवलेले होते. रहस्यमय परिस्थिती अनुराधा या मृताअवस्थेत सापडल्या होत्या. हरियाणाच्या माजी उपमुख्यमंत्री चंद्र मोहन यांच्यापासून वेगळे होऊन स्वतंत्र राहणार्या फिजा यांचा मृतदेह अचानक सापडला होता.सीबीआय तपासात मृत्यूचे कारण समजले नाही.त्यामुळे या प्रकरणाचा संशयाचा भुंगा कायम आहे.
14 वर्षीय आरुषी तलवार आणि तलवार परिवारचा घरगुती नोकर हेमराज या दोघांची हत्या नोएडा स्थित तलवार निवास करण्यात आली होती. सीबीआयने सुरुवातीला आरुषीचे आई आणि वडील नुपूर आणि राजेश तलवार यांच्याकडे संशयाची सुई वळविली होती. नंतर खालच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरविले. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णायक पुराव्या अभावी दोघांची सुटका केली. खरे आरोपी अजूनही मोकाट आहे.
बॉलीवुड अभिनेत्री झिया खान मुंबईतील आपल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये फासावर लटकलेली सापडली. सुरूवातीला यास आत्महत्या मानले गेले. त्यानंतर तिच्या आईने कोर्टात धाव घेतली. या संदर्भात अभिनेता सूरज पांचोली याच्या आरोप लावण्यात आला. या संदर्भात स्थानिक पोलिसांवर टिका झाल्यानंतर सीबीआयकडे हे प्रकरण गेले आहे. सीबीआयला ही हत्या असल्याच्या दाव्याबाबत आवश्यक कोणतेही पुरावे सापडलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते.
कांग्रेस नेते शशि थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर या देखील रहस्यमय रित्या दिल्लीतील एका हॉटेलात मृतावस्थेत सापडल्या होत्या. या प्रकरणात आरोप -प्रत्यारोप प्रचंड झाले होते. विष देण्यासह अनेक आरोप झाले होते. परंतू कोणतेही पुरावे सापडले नाहीत. हा मृत्यू आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू म्हणूनच गणला केले.
इंद्राणी मुखर्जी हीची मुलगी शीना बोरा हिला कथित रुपाने तिच्या आईने संपविल्याचे म्हटले जात नाही. शीना बोरा हीला इंद्राणी मुखर्जी यांनी दुसऱ्या पतीच्या मदतीने संपवल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी यांना अटक देखील झाली होती. आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचे संपूर्ण सत्य अद्याप बाहेर पडलेले नाही. प्रकरण वादग्रस्त झाले आहे.
बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून, 2020 रोजी मुंबई अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत सापडले होते. मुंबई पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासानुसार आत्महत्येचा संशय येत आहे. हे प्रकरण देखी सीबीआयला सोपविण्यात आले होते. या प्रकरणाची सीबीआयची मागणी झाली होती. या प्रकरणात सीबीआयने कोणताही खुलासा केलेला नाही.