नवी दिल्ली : राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या (NFHS) अहवालातून महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर आली. या आकडेवारीनुसार देशातील विवाहीत महिला आपल्या पतीला लैंगिक संबंध (Physical Relations) ठेवण्यास थेट नकार देतात. नकार देण्याचं हे प्रमाण आणि याची आकडेवारी चकीत करणार आहे. तब्बल 82 टक्के विवाहीत महिला या आपल्या पतीला शारीरिक संबंध ठेवण्याबाबत नकार देण्यास सक्षम असल्याचं समोर आलंय. तर पत्नी जर थकली असेलआणि तिनं संबंधास नकार दिला, तर ते रास्त कारण असून ते प्रामाणिकपणे स्वीकारलं पाहिजं, असं मत 66 टक्के पुरुषांनी नोंदवलंय. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून (National Family Health Survey-5) याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. यात विवाहीत महिलांपैकी 32 टक्के महिला या काम करतात. हे प्रमाण एक तृतीयांश इतकं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतचा अहवाल नुकताच समोर आणला होता. गेल्या आठवड्यात समोर आणण्यात आलेल्या या अहवालाची आकडेवारी अनेक सवाल उपस्थित करणारी अशी आहे.
दोन टप्प्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. 17 जून 2019 पासून 30 जानेवारी 2020 पर्यंत एकूण 17 राज्यात या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर 2 जानेवारी 2020 पासून 30 एप्रिल 2021 पर्यंत एकूण 11 राज्यात आणि तीन केंद्रशासित प्रदेशात याबाबतचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान, पुरुषांना चार पर्याय देत पत्नीसोबतच्या लैंगिक संबंधांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. पत्नीनं जर लैंगिक संबंधास नकार दिला, तर त्यावर कशा पद्धतीनं पुरुष रिएक्ट होऊ शकतात, याचे उत्तरादाखल चार पर्याय देण्यात आले होते.
प्रश्न : पत्नीनं लैंगिंक संबंधास नकार दिल्यास, त्यावर पुढपैकी कोणत्याप्रकारे रिएक्ट व्हाल?
सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीतून महत्त्वपूर्ण बाब समोर आली. 15 ते 49 वयोगटातील पुरुषांनी याबाबत आपली मतं नोंदवली होती. यातील 72 टक्के पुरुषांना देण्यात आलेले चारही पर्याय मान्य नव्हते. तर 6 टक्के पुरुषांना चारही पर्याय मान्य होते. जवळपास सर्व राज्यात चारही पर्याय मान्य नसलेल्या पुरुषांची संख्या ही 70 टक्क्यांहून अधिक नोंदवली गेली होती. दरम्यान पंजाब, कर्नाटक आणि लडाखमध्ये हे प्रमाण 50 टक्क्यापेक्षाही कमी असल्याचंही निरीक्षण नोंदवलं गेलंय.
पंजाबमध्ये 21 टक्के पुरुषांना चारही पर्याय योग्य वाटले, चंदीगडमध्ये 28 टक्के, कर्नाटकमध्ये 45 टक्के तर लडाखमध्ये 46 टक्के पुरुषांना चारही पर्यांय योग्य वाटलेत.
गेल्या वेळच्या तुलनेत यंदा काम करणाऱ्या विवाहीत महिलांची टक्केवारी वाढली आहे. पण हे प्रमाण अत्यंत अल्प आहे. अवघ्या एका टक्क्याने विवाहीत महिलांची काम करण्याची टक्केवारी वाढली आहे. या आधीच्या अहवालात 31 टक्के विवाहीत महिला काम करत होत्या. तर यंदाच्या अहवालात ही आकडेवारी आता 32 टक्क्यांवर पोहोचली आहे.