नवी दिल्लीः देशविरोधी आणि भारताच्या अखंडतेला बादक ठरणाऱ्या, देशविरोधात अखंडता चालवणाऱ्या भारतातील 747 वेबसाईटवर बंदी (794 Website Ban)घालण्यात आल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Information and Broadcasting Minister Anurag Thakur) यांनी दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला करताना सांगितले की, देशविरोधी मजकूर चालवणाऱ्यांवर विरोधक काही बोलणार नाहीत, उलट त्यांचे समर्थन करतील अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. देशात वाईट प्रवृत्तींविरोधात विरोधक बोलत नाही मात्र सरकारवर जोरदार पणे टीका केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
“2021-22 में लगभग 94 YT channels, 19 SM एकाउंट्स , 747 URL को बंद करने का काम @MIB_India ने किया हैै। देश विरोधी ताकते जो भारत के खिलाफ propaganda खड़ा करते है उनके खिलाफ मोदी सरकार ने कड़ी कार्यवाही की है”
– श्री @ianuragthakur राज्य सभा में प्रश्न काल के दौरान @sansad_tv pic.twitter.com/IqoaOwZBXI
— Office of Mr. Anurag Thakur (@Anurag_Office) July 21, 2022
लोकसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, अशा देशाला घातक ठरणाऱ्या आणि देशविरोधात असणाऱ्या शक्तींना पाठिंबा देणाऱ्या यूट्यूब चॅनेल आणि वेबसाईटवर बॅन करण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी मागील वर्षाचा दाखला देत ते म्हणाले की, याप्रकारची कारवाई मागील 2020-21 सालीही करण्यात आली होती, त्यावेळी 94 वेबसाईट बॅन करण्यात आल्या होत्या.
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार हल्ला करत सांगितले की, देशविरोध कारवाया करणाऱ्यांविरोधात, देशविरोधी माहितीचा प्रसार करणाऱ्यांविरोधात विरोधकांकडून काहीही बोलले जात नाही, मात्र नरेंद्र मोदी सरकारवर ते जोरदार टीका करतात असंही त्यांनी सांगितले