वॉशिंगमशिनमुळे हल्ली कपडे धुण्यासारखे मोठ्या मेहनतीचे काम सोपे बनले आहे. परतू कपडे धूताना तुम्ही वॉशिंगमशिन नीट चेक करताना, कारण केरळातील कन्नूर जिल्ह्यात एक भयंकर अपघात होणार होता. परंतू केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या टेक्निशियनचे प्राण बचावल्याची घटना घडली आहे. त्याचे झाले काय अनेक दिवसांपासून वॉशिंग मशिन बंद असल्याने ती दुरुस्तीसाठी अडगळीत ठेवली होती. या वॉशिंग मशिनला दुरुस्तीसाठी टेक्निशियनला बोलावण्यात आले होते. त्यानंतर जे घडले ते भयंकरच होते…
केरळातील कन्नूर जिल्हयातील एका घरात वॉशिंगमशिन बिघडल्याने ती अडगळीत ठेवली होती. घरातल्या लोकांना टेक्निशियनला बोलावले. त्यानंतर टेक्निशियन यथावकाश आला. टेक्निशियनने वॉशिंगमशिन दुरुस्त करण्यासाठी त्या घराचा पत्ता विचारत तो आला. त्यानंतर त्याने वॉशिंगमशिनमध्ये काय फॉल्ट आहे हे पाहण्यासाठी त्याने वॉशिंगमशिनचा प्लग लावला. त्यानंतर त्याला काही तरी दिसले म्हणून त्याने वॉशिंगमशिनमध्ये हात घातला. त्याला वाटले चुकून कपडे राहीले आहेत. त्याने ती वस्तू उचलून हाताने काढली तर ती वळवळली. त्याचे लक्ष गेले तो साप होता. त्याने घाबरत पुन्हा त्या सापाला वॉशिंगमशीनमध्येच टाकून दिले.
कन्नूरच्या तलिपरम्बा परिसरातील पी.व्ही. बाबू यांच्या घरात हा धक्कादायक प्रकार घडला. टेक्निशियन जनार्दन कमदबेरी यांनी मशिनची दुरुस्ती केली त्यानंतर मशिन सुरु होते की नाही याची ट्रायल घ्यायची होती. त्यांनी वॉशिंग मशिनचा स्विच ऑन करणार इतक्याचे त्या काही तर कपड्या सारखे दिसले त्याने आता हात टाकला तर हाताला ती वस्तू गार लागली. त्याला वाटले कपडा असेल म्हणून त्याने वस्तू पाहीले तर त्याला धक्काच बसला. त्याचे हृदय इतक्या जोरजोरात धडधडू लागले. कारण त्याच्या हातात सापाचे पिल्लू होते. त्याने ते पुन्हा वॉशिंगमशिनमध्ये टाकले.
वॉशिंगमशिन दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत अडगळीत होती. प्राणी मित्र संघटनेच्या स्वयंसेवक स्नेक कॅचरना त्यांनी फोन केला. त्यानंतर स्वयंसेवक आले त्यांनी अलगद त्या पिल्लाला बाहेर काढले. तर सर्वांना धक्का बसला कारण अत्यंत जहाल विषारी अशा कोब्रा नागाचे ते पिल्लू होते. बचाव पथकातील अनिल त्रिचंबरम यांनी या नागाच्या पिल्लाला नंतर जंगलात सोडून दिले. अनिल म्हणाले आम्ही इतक्या वर्षांत प्रथमच वॉशिंगमशिनमधून सापाचे पिल्लू काढले आहे.हे पिल्लू कदाचित टॉयलेटच्या नाल्यातून घरात शिरले असावे असा कयास आहे.