फिरोजाबाद : कोरोना लसीकरण महिने नंतर देशभरात आता कोरोनाचा बूस्टर डोस दिला जात आहे. एका मृत महिलेला कोरोनाचा बूस्टर डोस(corona booster dose) दिल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) उघडकीस आला आहे. या मृत महिलेच्या नातेवाईकांना तिला कोरोनाचा बूस्टर डोस दिल्याचे प्रमाणपत्र ही पाठवण्यात आले आहे. चाप महिन्यांपूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला होता. यामुळे बुस्टर डोस घेतलेल्या लोकांचा आकडा वाढवून दाखवण्यासाठी मृतांची नावे देखील लस घेतलेल्या लाभीर्थींच्या यादीत टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमे दरम्यान आकड्यांची फेराफार झाल्याचा आरोप झाला होता. यानंतर आता फसवणूक झाल्याच्या तक्रारींनंतर आता बूस्टर डोस मिळवण्यातही फसवणूक समोर आले आहे. मृत महिलेला कोरोनाचा बुस्टर डोस दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बुस्टर डोस दिलेल्या नावांच्या यादीत मृत महिलेचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अनार देवी असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या नातेवाईच्या मोबाईलवर 7 ऑगस्ट रोजी बुस्टर डोस दिल्याचा मेसेज आला. अनार देवी यांच्या मुलाचा नंबर कोवीड पोर्टवर नोंद आहे. त्यांच्या मुलाच्या मोबाईलर अनार देवी यांना 7 ऑगस्ट रोजी कोरोनाचा बुस्टर डोस दिल्याचा मेसेज आला. हा मेसेज पाहून अनार देवी यांच्या कुटुंबियांना धक्का बसला. कारण 17 मार्च रोजीच अनार देवी यांच्या मृत्यू झाला आहे.
आपल्या मृत आईला कोरोनाचा बुस्टर डोस दिल्याचा मेसेज पाहून त्यांचा मुलगा अचंबीत झाला. त्याने कुटुंबातील इतर सदस्यांना हा मेसेज दाखवला. या नंतर याबाबत अनार देवी यांच्या कुटुंबीयांनी आरोग्य केंद्रात तक्रार केली. यासंदर्भात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेशकुमार प्रेमी चौकशीचे आदेश दिले आहेत. लसीकरणात हा निष्काळजीपणा कोणत्या स्तरावर घडला आहे. त्याची चौकशी केली जाईल असे प्रेमी यांनी सांगीतले.
उत्तर प्रदेसात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी चार नवीन रुग्ण आढळले आहे. यामुळे कोरोनो रुग्णांचा आकडा 58 वर पोहोचला आहे. रुग्णांचा वाढता आलेख पाहून आरोग्य विभागातर्फे रविवारी 321 ठिकाणी बूस्टर डोस देण्यासाठी शिबिरे घेण्यात आली. यामध्ये 27 हजार लोकांना बुस्टर डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यामुळेच फिरोजाबादमध्ये, मृत महिलेला बूस्टर डोस दिल्याची नोंद करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.