आता आपण कोणत्याही नवीन किंवा अनोळखी ठिकाणी गेलो तरी जास्त भाती नसते. आपल्या आजूबाजूला असलेले हॉटेल्स, पेट्रोलपम्प किंवा इतर कोणताही पत्ता शोधत बसावा लागत नाही. कारण सगळ्यांकडे गुगल मॅप असतो. आपल्या पाहण्यांकडे गेल्यावर जास्त काही न बोलता फक्त लोकेशन सेंड कर म्हटलं की काम होतं. नाहीतर आधी घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणण्यासाठी जावं लागायचं. ऑनलाईन ऑर्डर किंवा पर्यटनासाठी जाताना थेट गुगल मॅप लावून प्रत्येकजण जातो. मात्र गुगल मॅपवर डोळे बंद करून विश्वास ठेवत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
हैदराबाद या राज्यामधून पर्यटक दक्षिण केरळमध्ये आले होते. रस्त्यांची माहिती नव्हती त्यामुळे त्यांनी केरळमधील कुरुपंथरा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला. या भागात जोरदार पाऊस झाला होता त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पाणी असल्यामुळे गाडी चालकाने आपला वेग अवघा 10 किमी इतकाच ठेवला होता. पण अचानक एका ठिकाणी त्यांच्यासोबत खतरनाक घटना घडली.
गुगल मॅप चालू होता, रस्त्यावर एका ठिकाणी पाणी साचलेलं होतं. मात्र गुगल मॅपमध्ये त्या ठिकाणाहून रस्ता असल्याचं दाखवत होतं. गाडी चालकाने कमी वेगाने गाडी पाण्यात घातली पण पाहता पाहता गाडी खोल पाण्यात चालल्याचं त्याला जाणवलं. गाडीच्या खिडक्या बंद होत्या, पण जेव्हा सर्वांना समजलं की गाडी पाण्यात बुडत आहे त्यावेळी सर्वांनी काचा उघडल्या आणी बाहेर पडले. एका महिलेसह चार जण या गाडीमध्ये बसलेले होते. वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे अनर्थ घडला नाही.
दरम्यान, या भागातच पोलीस पेट्रोलिंग करत होते, तर स्थानिक रहिवाशांनाही या घटनेबाबत माहिती होताच त्यांनी लोकांनी वाचवलं आणि त्यांची सुटका केली. मात्र पूर्ण गाडी या पाण्यामध्ये बुडाली. हा पहिलीच घटना नाहीतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन तरूण डॉक्टरांचाही गुगल मॅपमुळे या ठिकाणी मृत्यू झाला होता.