भोपाळः काँग्रेसची आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशमधून मार्गक्रमण करत आहे. या भारत जोडो यात्रेत अबालवृद्धांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत प्रत्येकजण या यात्रेचा एक भाग बनत आहेत. मध्य प्रदेशातून ही यात्रा जात असताना आता तेथील एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा आहे, त्याने त्याची साठवलेली सगळी पिग्गी बँक राहुल गांधींच्या हातात दिली आहे, आणि सांगत आहे की, ही पिगी बँक तुमच्याकडे ठेवा भारत जोडोसाठी कामा येईल.
त्याग और स्वार्थहीनता बचपन में मिले संस्कारों से आते हैं।
ये गुल्लक मेरे लिए अनमोल है, बेशुमार प्यार का ख़ज़ाना है। pic.twitter.com/yambnZaRkz
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 27, 2022
यावेळी त्याने राहुल गांधींना सांगितले आहे की, मी साठवलेले हे पैसै आहेत, तुम्ही तुमच्याकडे ठेऊन घ्या. कारण हे भारत जोडोसाठी कुठे ना कुठे उपयोगी पडतील. या लहानग्याचा हा व्हिडीओही प्रचंड व्हायरल झाला आहे.
आपली पिगी बँक राहुल गांधी यांच्या हातात देताना तो चिमुकला म्हणतो आहे की, पिगी बँकेतील हे पैसे मला मिळालेल्या पॉकेट मनीतून भारत जोडो यात्रेसाठी साठवले आहेत.
गरज पडली तर हे पैसै भारत जोडो यात्रेच्या कामी येतील. असंही त्याने सांगितले आहे. राहुल गांधींनीही त्याच्या त्या पिगी बँके मनापासून स्वीकारली आहे, आणि आपल्याकडे ठेवून घेतली आहे.
राहुल गांधी यांना पिगी बँक देणारा हा लहान मुलगा भोपाळमधील यशराज परमार असं त्याचे नाव आहे. यशराजचे वय दहा वर्षे असून तो म्हणतो राहुल गांधींच्या भारत जोडोसाठी पैश्याची कधीच कमतरता भासता कामा नये. पैसै नाहीत म्हणून ही यात्रा थांबता कामा नये, ही यात्रा अशी अखंड चालू राहिली पाहिजे.
यशराज परमारने राहुल गांधींना त्याची पिगी बँक दिल्यानंतर त्याचा तो व्हिडीओ शेअरसुद्धा केला आहे. राहुल गांधी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे.
त्यामध्ये तो लहान यशराज सांगतो की, राहुलस सर यांच्यामधील एक गोष्ट मला प्रचंड आवडली आहे ती ही की, ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत.
आज माझी पिगी बँक मी त्यांना दिली आहे. जेव्हा पासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली होती, तेव्हापासून त्यासाठी मी हे पैसे साठवत आहे.
या लहान मुलाने यात्रेबद्दल बोलताना सांगितले की, मला जेवढं समजतं त्यावरून मला असं वाटतं की, माझ्या मते मुसलमान आणि हिंदूमध्ये नेहमी वाद विवाद होतात.
ती परिस्थिती बदलण्यासाठी एकमेकांना जोडण्यासाठी या यात्रेची सुरूवात झाली आहे. भारत जोडो यात्रेचा सरळ सरळ एकच अर्थ आहे की, हिंदू-मुसलमान यामध्ये कोणताच भेदभाव नाही, आपण सगळे समान आणि एक आहोत असं मत यशव परमार यांनी व्यक्त केले आहे.