मेट्रोमध्ये हे काय होतंय ? तरूण जोडप्याचे भर मेट्रोतच लिपलॉक, Video व्हायरल

| Updated on: May 10, 2023 | 11:53 AM

दिल्ली मेट्रोमध्ये एक तरूणी बिकीनी घालून आल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक तरूण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक करत असल्याचे दिसत आहे.

मेट्रोमध्ये हे काय होतंय ? तरूण जोडप्याचे भर मेट्रोतच लिपलॉक, Video व्हायरल
भर मेट्रोत जोडप्याचे किस, व्हिडीओ झाला व्हायरल
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (DMRC)कडक कारवाईनंतरही मेट्रोमध्ये (Metro) अश्लील कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलांना आवर बसलेला नाही. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोचा आणखी एक लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक जोडपं मेट्रोमध्ये फरशीवर बसून लिपलॉक (liplock) करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा फरशीवर बसला आहे आणि त्याची गर्लफ्रेंड त्याच्या मांडीवर झोपली आहे. दोघेही बिनदिक्कत आणि न डगमगता एकमेकांना लिपलॉक करत आहेत. समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

व्हिडिओ

आता सोशल मीडिया वापरकर्ते या व्हिडिओबाबत डीएमआरसीवर टीका करत असून प्रश्नही विचारत आहेत. एका युजरने डीसीपी दिल्ली मेट्रोला टॅग करत ‘ तुम्ही जागे आहात का?’ असा प्रश्नच विचारला आहे.

त्याचवेळी व्हिडिओ पाहून काही लोक टोमणे मारताना दिसले. एका युजरने लिहिले की, ‘कोरोना पीडितेचे प्राण तोंडातून श्वास देऊन वाचवणे हाही या देशात गुन्हा झाला आहे. असा टोला त्याने लगावला आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘ ही मुलगी नशेत दिसत आहे आणि मुलगा खूप शांत आहे.’ तसेच काही लोकांनी ही मुलगी दारूच्या नशेत असल्याचा दावाही केला आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी दिल्ली महिला आयोगाने (Delhi Commission for Women- DCW) मेट्रोमध्ये एका पुरुषाचा अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल शहर पोलिसांना नोटीस बजावली होती. आयोगाने सांगितले की, एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिल्ली मेट्रोमध्ये एक व्यक्ती निर्लज्जपणे ‘अश्लील कृत्य’ करताना दिसत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मालीवाल म्हणाल्या की, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिल्ली मेट्रोमध्ये एक व्यक्ती निर्लज्जपणे हस्तमैथुन करताना दिसत आहे. ही अत्यंत घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.

दिल्ली मेट्रो : कधी बिकिनीमध्ये प्रवास तर कधी जोडप्याचे KISS…

महिला आयोगाने म्हटले आहे की, दिल्ली मेट्रोमध्ये अशी प्रकरणे अधिकाधिक समोर येत आहेत आणि अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे जेणेकरून मेट्रोमध्ये महिलांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल.

मेट्रो प्रवाशांना DMRC ने केले आवाहन

DMRC ऑपरेशन आणि मेंटेनन्स कायद्याच्या कलम-59 अंतर्गत, असभ्यता हा दंडनीय गुन्हा मानला गेला आहे. याबाबत डीएमआरसीने नुकतेच लोकांना मेट्रोमध्ये प्रवास करताना मर्यादा पालन करण्याचे आवाहन केले होते. सहप्रवाशांच्या भावना दुखावतील असे वर्तन इतर प्रवाशांनी करून नये किंवा तसा पोशाखही परिधान करून नये, असे आवाहन डीएमआरसीतर्फे करण्यात आले.

प्रवास करताना कोणत्या कपड्यांची निवड करावी हा प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे, परंतु प्रवाशांनी जबाबदार नागरिकासारखे वागणे अपेक्षित आहे, असेही डीएमआरसीने आपल्या निवेदनात म्हटले होते.

आता फ्लाईंग स्क्वॉड ठेवणार नजर

काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये एका बिकिनी गर्लचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. तेव्हापासून दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच डीएमआरसीकडे मेट्रोमधील अश्लीलता रोखण्यासाठी नियम बनवण्याची मागणी केली जात होती. आता दिल्ली डीएमआरसीने मेट्रोच्या डब्यांवर गस्त घालण्यासाठी फ्लाइंग स्क्वॉड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पथकात पोलीस आणि सीआयएसएफच्या जवानांचा समावेश असेल. गस्त घालणारे सैनिक साध्या पोशाखातही असू शकतात. लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ते स्वतः मेट्रोने प्रवास करणार आहेत.