दिल्लीतील एका रामलीला महोत्सवाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात रामाची भूमिका करणारा अभिनेता डायलॉग बोलताना दिसत आहे.रामाचा अभियन करताना हा अभिनेता प्रार्थना करताना देखील दिसत आहे. त्याच वेळी या अभिनेत्याच्या छातीत कळा येण्यास सुरुवात होते.आणि आपला हात हृदयावर ठेवतात आणि व्यासपीठाच्या मागे जातात. लोकांना देखील काही समजत नाही, नक्की काय झाले. परंतू त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने हॉस्पिटलात नेण्यात येते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले.
दिल्लीच्या शाहदरा परिसरात नवरात्री निमित्ताने रामलीलाचे सादरीकरण होत होते. त्यात रामाची भूमिका करणाऱ्या एका कलाकाराच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यानंतर तो व्यासपीठाच्या वर खळबळ उडाली. या कलाकाराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. या कलाकाराचे नाव सुशील कौशिक असून त्यांना रामलीलात अभिनय करण्याची आवड असून ते पेशाने प्रॉपर्टी डिलर असल्याचे सांगण्यात येते.
येथे पाहा व्हिडीओ –
Ramleela artiste died of heart attack on stage in Shahdara, Delhi. 45 year old Sushil Kaushik was playing the role of Ram on stage. Then while speaking the dialogue he had a heart attack. #Delhi #Ramleela #HeartAttack #ViralVideo
Types and Symptoms of #HeartAttack #AllEyesOnDasna pic.twitter.com/ljLfmTKoLr— सुभम यादव (लोहिया वाहिनी) (@subhamyada46836) October 6, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार सुशील यांना व्यासपीठावरच हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. 45 वर्षांचे सुशील कौशिक पेशाने प्रॉपर्टी डीलर होते. परंतू रामाचे ते भक्त असल्याने रामलीलात ते रामाची भूमिका करायचे.
सुशील कौशिक शाहदरा येथील विश्वकर्मा नगरातील शिवा खंड येथील रहिवासी होते. त्यांना अभिनयाची आवड होती. रामाची भूमिका करताना त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांचा मृत्यू झाला.या रामलीलेचे आयोजन जय श्री रामलीला विश्वकर्मा नगर मंडळाने केले होते.