ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : केदारनाथमध्ये मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना (Kedarnath Helicopter crash) घडली. सकाळच्या सुमारास एक खासगी हेलिकॉप्टर केदारनाथ जवळ कोसळलं. आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा जण हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी (6 killed in Helicopter crash) पडलेत. एकूण आठ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते, असं सांगितलं जातंय. उत्तराखंडच्या केदारनाथपासून (Uttarakhand, Kedarnath Crash) अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं.
Uttarakhand | A helicopter carrying Kedarnath pilgrims from Phata crashes, casualties feared. https://t.co/LNtolzE7ni pic.twitter.com/X7nvVdbkcy
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) October 18, 2022
आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये 8 भाविक होते. या भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जात असताना काळानं 6 प्रवाशांना घाला घातला. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
केदारनाथ में तीर्थयात्रियों को ले जा रहा हेलीकॉप्टर हुआ क्रैश, 6 श्रद्धालुओं की मौत की खबर, मची अफरातफरी
#helicoptercrash #Kedarnath #Uttarakhand pic.twitter.com/YyTqKoBrVT— Rudranath Thakur (@Rudranath98) October 18, 2022
हेलिकॉप्टर दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथकही रवाना झालंय. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली होती. हेलिकॉप्टरचा अक्षरशः चुराडा झाल्याचे थरकाप उडवणारे फोटोही समोर आले आहेत. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.
नेमका ही दुर्घटना कशामुळे घडली, याची उकल होऊ शकलेली नाही. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, तज्ज्ञांकडून आता या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास केला जाणार आहे.
केदारनाथपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरूरचट्टी या गावात हेलिकॉप्टर कोसळलं. यानंतर एकच खळबळ उडाली. हेलिकॉप्टर दुर्घटनेवेळी काळजाचा थरकाप उडवणारा मोठा आवाज झाला होता. त्यामुळे आजूबाजूचे लोकही धास्तावले. डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं.