शत्रूच्या देशात गुप्तहेर म्हणून गेला, परंतू एकाच्या चुकीमुळे सर्व खेळ बिघडला, देशाने त्याला स्वीकारलेच नाही

| Updated on: Jul 20, 2023 | 2:09 PM

आता सीमा हैदर प्रकरण गाजत आहे. मागे सरबजीत सिंह प्रकरण खूपच गाजले होते. त्यावर चित्रपटही आला होता. पाकिस्तानात कैद्यांनी त्याला तुरुंगातच मारले. अशाच प्रकारची एका टायगरची कहाणी आहे.

शत्रूच्या देशात गुप्तहेर म्हणून गेला, परंतू एकाच्या चुकीमुळे सर्व खेळ बिघडला, देशाने त्याला स्वीकारलेच नाही
BLACK TIGER RAVINDRA KAUSHIK
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : सीमा हैदर ( Seema Haider And Sachin Love Story )  प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. सीमावर ती गुप्तहेर ( Seema Spy ) असल्याचा संशय आहे. परंतू शत्रू राष्ट्रात अनेकदा हेर म्हणून अनेक वर्षांपासून माणसं पेरण्यात येत असतात. परंतू भारतीय गुप्तहेर संघटना रॉ आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय ( ISI ) अशा संघटना परस्परांच्या देशात अत्यंत व्यावसायिक गुप्तहेर नेमत असतात. गुप्तहेर जेव्हा शत्रू राष्ट्राकडून पकडले जातात. तेव्हा मात्र त्यांचे प्रचंड हाल होतात. देश त्यांना स्वीकारु शकत नाही. त्यामुळे त्यांची अवस्था ना घर ना घाटका अशी होते. अशाच एका ब्लॅक टायगर नावाच्या हेराची ही कहाणी थरारक आहे.

रवींद्र कौशिक यांना ब्लॅक टायगर नावाने ओळखले जाते. ते पाकिस्तानात जाऊन सैन्यात मेजर पदापर्यंत गेले होते. मात्र एकाच्या चुकीने त्यांचा सर्व भेद शत्रूराष्ट्राला कळला. आणि सारा खेळ संपला. गुप्तहेर बनून शत्रू राष्ट्रात राहून तेथील सर्व माहिती आपल्या देशाला कळवित रहाणे हा सर्वात खतरनाक पेशा असतो. कोणत्याही क्षणी आपल्याला पकडले जाऊ शकते. केव्हाही आपला मृत्यू होऊ शकतो हे माहीती असून अशी कामगिरी करण्यासाठी मोठे काळीज लागते.

वडील एअरफोर्समध्ये होते

रवींद्र कौशिक यांचा जन्म राजस्थानच्या गंगानगरात 11 एप्रिल 1952 रोजी झाला. त्यांचे वडील वायू सेनेत होते. त्यांना अभिनयाचे वेड होते. त्यांनी बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले. ते दिसायला इतके हॅण्डसम होते की लोक त्यांना विनोद खन्ना म्हणायचे. लखनऊमध्ये एका अभिनयाच्या शिबिरात त्यांची भारतीय गुप्तहेर संघटना रॉच्या अधिकाऱ्यांशी ओळख झाली. अखेर ते 23 वर्षांचे असताना त्यांची ट्रेनिंग सुरु झाली. त्यांना मुस्लीम रितीरिवाज, उर्दू, अरबी भाषा शिकविण्यात आली, पंजाबी तर त्यांना येतच होती. त्यांना मोठी जबाबदारी सोपविली गेली. सात देशात त्यांना पाठविले.

पाकिस्तानात लग्न केले

1978 मध्ये रविंद्र कौशिक ते दुबईला नोकरीला जातो सांगून नबी अहमद शकीर नावाने पाकिस्तान गेले.कराची विद्यापीठात त्यांनी प्रवेश केला. वृत्तपत्रात जाहीरात पाहून ते सैन्यात भरती झाले. ते पाकिस्तानात इतके मिसळून गेले की 1979 ते 1983 मिलिट्रीत सर्व्हीसमध्ये होते. मेजरपदापर्यंत पोहचले. त्यांनी महत्वाच्या बातम्या भारताला दिल्या. ज्याचा भारताला खूपच फायदा झाला. त्यांनी पाकिस्तान आर्मीतील टेलरच्या मुलीशी लग्न केले,त्यांना मुलही झाले. ते भावाच्या लग्नासाठी एकदा भारतात आले. त्यांनी लिहिलेल्या पत्रांमुळे घरच्यांना समजले की ते गुप्तहेर आहेत.

इनायत फुटला आणि खेळ संपला

साल 1983 मध्ये इनायत मसीह नावाच्या एका एजंटला पाकिस्तानात कागदपत्रे देण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्याला रॉने पकडले. इनायत पंजाबमधून भरती झाला होता. त्याला पकडताच त्याला छळल्यानंतर त्याने सर्व सत्य ओकले. त्याने रविंद्र कौशिक बद्दल सर्व माहीती देऊन टाकली आणि रवींद्र कौशिक यांचा खेळ संपला. त्यांना 18 वर्षे छळण्यात आले. 1985 ला त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. येथे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले. त्यांना रॉ आणि भारत सरकारने स्वीकारले नाही. ‘द टेलीग्राफ’ च्या वृत्तानूसार जर आपण अमेरिकेसाठी इतके काम केले असते तर अमेरिकेने मला सोडविण्यासाठी प्रयत्न केले असते अशी निराशात्मक पत्रे त्यांनी कुटुंबियांना पाठविली होती.