उत्तराखंड : राज्यात (Uttarakhand) एक अनोखी घटना घडली आहे. कुत्र्याची (Dog) शिकार करायला गेलेला बिबट्या (leopard) सुध्दा बोअरवेलमध्ये फसला. त्यामध्ये दोघांचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे कुत्रा आणि वाघ दोघेही एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे व्हिडीओ पाहायला मिळत आहे. ही घटनेचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर तिथल्या लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एक प्लॅन तयार केला आणि तिथून वाघाला आणि कुत्र्याला सुखरुप बाहेर काढल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
उधमसिंह नगर जिल्ह्यातील हा प्रकार आहे. कुत्र्याची बिबट्या शिकार करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी कुत्रा पाण्यात पडला, कुत्र्यासोबत बिबट्या सुध्दा पाण्यात पडला. त्यानंतर दोघांनी आतमध्ये सोडण्यात आलेल्या पाईपचा आधार घेतला. कुत्र्याला आणि वाघाला दोघांना बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.
ज्यावेळी कुत्रा मोका पाहून तिथून गेला, त्यावेळी लोकांना या प्रकरणाची सगळी माहिती मिळाली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सुचना मिळाल्यानंतर वनविभागाची टीम तिथं दाखल झाली. अनेक तास मेहनत घेतल्यानंतर बिबट्याची अधिकाऱ्यांनी सुटका केली. ज्यावेळी बिबट्याची सुटका झाली, त्यावेळी बिबट्याने जंगलात धूम ठोकली.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. गौरा फार्म गावातील हिडिंबा देवीच्या मंदीराच्या जवळ श्र्वेता अग्रवाल यांच्या शेतात ही घटना घडली. जिल्हा प्रशासनाच्या टीमने बिबट्या आणि कुत्र्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केला होता.