भोपाळ | 19 डिसेंबर 2023 : ख्रिसमसच्या महिन्यात लहान मुले सांताक्लॉजच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. सांताक्लॉज आपल्याला काय भेवस्तू आणणार याची ते वाटच पहाता असतात. भरपूर भेटवस्तू मिळणार याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. अनेकदा, पालक आपल्या मुलांच्या अधिक आनंद मिळावा यासाठी काही भेटवस्तू गुप्त ठेवतात. नंतर असे सांगतात की सांताक्लॉजने या भेटवस्तू रात्रीच त्यांच्यासाठी पाठवल्या आहेत. पण, सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूसाठी आतुर झालेल्या एका मुलाने थेट सांताक्लॉजलाच एक पत्र लिहिले आहे. हे पत्र खूपच व्हायरल झाले आहे. हे पत्र वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
व्हायरल झालेल्या या पत्रात मुलाने थेट सांताकडे गिफ्ट मागितले आहे. त्यात त्यांने जे काही लिहिले आहे ते खूपच मनोरंजक आणि आश्चर्यकारक आहे. हे पत्र सोशल माध्यमावर पोस्ट झाल्यावर एका युजर्सने त्याची प्रशंसा केलीय. या मुलाने प्रत्येक शब्द ज्या तपशीलासह लिहिला आहे ते सांताने नक्कीच ऐकले पाहिजे, असे हा युजर्स म्हणाला आहे.
काही किंचित मोठी मुले सांताकडे आपल्याला काय गिफ्ट हवे ते पत्र लिहून कळवितात. ते पत्र एका गुप्त ठिकाणी ठेवतात. त्यांची अशी भाबडी आशा असते की ज्याप्रमाणे सांताक्लॉज रात्री गुपचूप येऊन गिफ्ट ठेवून जातो. त्याचप्रमाणे आपलं लिहिलेले पत्रही ती गुपचूप येऊन वाचतो. त्यामुळेच लहान मुळे अशी पत्रे गुप्त ठिकाणी ठेवतात आणि आशा करतात की त्यांनी पत्रात मागितलेली भेट त्यांना मिळेल.
त्याचप्रमाणे या एका मुलानेही सांताला लिहिलेल्या पत्रामध्ये असे लिहिले आहे की ‘प्रिय सांता, कसा आहेस? मी चांगला आहे. येथे मी तुम्हाला ख्रिसमससाठी काय हवे आहे ते सांगत आहे. त्या पुढे मुलाने Amazon ची एक पूर्ण लिंक लिहिली आहे.
मुलाने हा असामान्य परंतु थेट मार्ग स्वीकारला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलाने त्याच्या पत्रातील सर्व 50+ अक्षरांची URL काळजीपूर्वक लिहिली आहे. अक्षरेही अचूक लिहिली आहेत. जेणेकरून सांताने चुकून गोंधळलेली लिंक उघडू नये. ही पोस्ट शेअर करताना वापरकर्त्याने ‘आजकालची मुले खूप सुंदर आहेत.’ अशी टॅग लाईन दिलीय.
मुलाचे पत्र शेअर झाल्यापासून ते खूपच व्हायरल झाले आहे. 9 लाखांहून अधिक वेळा ते पाहिले गेले आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी लिंकची खिल्ली उडवली. तर काहींनी लिंक शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, URL डी कोड करणे प्रत्येकासाठी कठीण होते. भविष्यात मुले अशा लांब वेब लिंक्स लिहिण्याऐवजी फक्त QR कोड वापरू शकतात असे एका युजरने म्हटले आहे. तर, दुसरा युजर या मुलाने प्रत्येक शब्द ज्या तपशीलाने लिहिला आहे ते सांताने नक्कीच ऐकावे असे म्हटले आहे.