‘उ. प्रदेशात एक लाखांहून अधिक भोंगे खाली उतरवले’, योगी आदित्यनाथ संन्यास घेतल्यानंतर 28 वर्षांनंतर स्वता:च्या घरी मुक्कामाला

| Updated on: May 03, 2022 | 9:13 PM

जी मंडळी संवादाने ऐकणार नाहीत, ते कायद्याने मानतील

उ. प्रदेशात एक लाखांहून अधिक भोंगे खाली उतरवले, योगी आदित्यनाथ संन्यास घेतल्यानंतर 28 वर्षांनंतर स्वता:च्या घरी मुक्कामाला
Image Credit source: twitter
Follow us on

पंचूर, उत्तराखंड– उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)  ५ वर्षानंतर त्यांचे मूल गाव असलेल्या पंचूरमध्ये (Uttarakhand)पोहचले आहेत. सन्यास घेतल्यानंतर २८ वर्षानंतंर ते पहिल्यांदा स्वताच्या घरी मुक्काम करणार आहेत. योगींना भेटण्यासाठी त्यांच्या तीन बहिणी आधीच घरी पोहचल्या आहेत. तर त्यांचे तिन्ही भाऊ घरीच आहेत. पुंचूरला पोहचल्यावर तिथून दोन किलोमीटरवर असलेल्या त्यांच्या महाविद्यालयात गुरु अवैद्यनाथ (Avaidnath)यांच्या मूर्तीचे अनावरण केले. यावेळी त्यांच्या हस्ते त्यांच्या शाळेतील शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला. ३५ वर्षांनंतर आपल्या गुरुजनांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले. आज आपण जेही आहोत ते आपल्या मात-पिता आणि गुरुंमुळे असल्याचेही त्यांनी सांगितले. योगींच्या या दौऱ्याकडे देशभरातील माध्यमांचे लक्ष असून, उत्तराखंड सरकारने या भागातील सुरक्षा वाढवली आहे.

 

हे सुद्धा वाचा

भोंग्यांबाबत मांडली योगींनी भूमिका

योगींनी या भाषणात उ. प्रदेशातील भोंगे हटवण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले- उत्तर प्रदेशातून भोंग्यांचा आवाज बंद झाला आहे. उ. प्रदेशातून एक लाखांहून अधिक भोंगे उतरवण्यात आले आहेत. राज्यात कुठेही रस्त्यावर नमाज पठणाचे कार्यक्रम होत नाहीयेत. युपीत गुंडगिरी होत नाहीये. जी मंडळी संवादाने ऐकणार नाहीत, ते कायद्याने मानतील. प्रत्येकाच्या श्रद्धेचा सन्माम व्हायला हवा, मात्र समस्येंकडे दुर्लक्ष होता कामा नये. उ. प्रदेशातील माफियांचे कंबरडे आता मोडले आहे. आता ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत.

 

 

यावेळी योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमधील भाजपा सरकारचेही कौतुक केले. तर या कार्यक्रमासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या भाषणात राज्याच्या मातीतील या वीराचे स्वागत आहे, अशा शब्दांत योगींचे कौतुक केले. महंत अवैद्यनाथ यांचे राम जन्मभूमी आंदोलनातील भूमिका अतीशय महत्त्वाची होती, असे सांगत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.