पृथ्वीनंतर कुठे दुसऱ्या ग्रहावर जीवन आहे काय ? या विषयीची उत्सुकता संपलेली नाही. आता अमेरिकेतली एका बापलेकीने मोठ्या मेहनतीने मंगळावरुन आलेल्या एका गुढ संदेशाचा वर्षभर अभ्यास करुन अवघड टास्क पूर्ण केल्याचे म्हटले जात आहे. या बापलेकीने एक वर्षांपूर्वी मंगळावरुन आलेला गूढ संदेशाचा डिकोड केला होता. यासाठी त्यांनी खूप मेहनत केली होती. या संदेशातील डेटा ऑनलाईन पोर्टलद्वारे सामान्य जनतेसाठी देखील खुला करण्यात आला होता.या अंतराळात घडामोडीत रस असणाऱ्या सर्वसामान्यांपासून संशोधकांनी हे आव्हान स्वीकारत आपल्या परीने योगदान दिले होते. परंतू यात बापलेकीच्या जोडीने सर्वात कमाल केली.
मंगळावरून आलेल्या सिग्नलला डिकोड करण्यासाठी युरोपीय अंतराळ एजन्सी ESA आणि INAF यांनी एक सिटीझन सांयटीस्ट कॉम्पीटीशन देखील ठेवले होते. परंतू केन आणि केली यांनी गेल्या 22 ऑक्टोबरला या रहस्यमय सिग्नलला डिकोड केले. यासाठी त्यांचा हजारो तासांचे संशोधन करावे लागले. अनेक प्रयोग करावे लागले आहेत.
या बापलेकीच्या जोडीला या रहस्यमयी सिग्नलमध्ये जैविक संदर्भ आढळले. सफेद डॉट्स आणि रेषा होत्या. त्यावर काळ्या रंगाचा बॅकग्राऊंड होता. यावरुन ते पेशींची निर्मिती करीत आहेत. याचा अर्थ जीवनाची निर्मिती होय. सिग्नलमध्ये पाच अमिनो एसिड होते. जे ब्रह्मांडात जीवनाच्या निर्मिती दाखवतात. सिग्नलला क्रॅक करुनही केन आणि केली यांना या गूढ संदेशातील अर्थ मात्र उलगडता आलेला नाही.
अलिकडे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या जुन्या मुलाखतीचा भाग समाजमाध्यमात व्हायरल झाला होता. त्यात पर जीवसृष्टीविषयी तुम्हाला कुतूहल वाटते का ? असा प्रश्न त्यांना मुलाखत काराने विचारला होता. त्यांनी यावर हो असे उत्तर दिले होते. त्यातील कोणती बाब तुम्हाला अधिक भावत असाही प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यावर त्यांनी एक तर ते आपल्या पेक्षा प्रगत असतील किंवा नसतील अशा दोन शक्यता आहेत. आपली जीवसृष्टी विश्वाच्या पसाऱ्यात अगदी अलिकडे जन्माला आलेली आहे. त्यामुळे त्याच्या आधी एखादी जीवसृष्टी जन्माला आलेली असू शकते आणि त्यांनी कदाचित पृथ्वीला भेट देखली दिलेली असू शकते असे सोमनाथ यांनी सांगितले होते. यातील पुढे गेलेल्या जीवसृष्टीला आपण किड्यामुंग्याप्रमाणे भासत असू ती आपली प्रगतीही पाहात असेल.आपल्याला जसा प्राणवायु ऑक्सिजन लागतो. त्यांना कदाचित मिथेन असा वायू लागत असावा असाही तर्क मांडल्याने ही मुलाखत चर्चेत आली होती.