Fact Check: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) वर्तमानपत्रातील एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हारल होतं आहे. ज्यामुळे IAS केडरमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तर यावरून IAS अधिकारी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. छत्तीसगडच्या एका रूगणालयातला (Hospital) फोटो व्हायरल होताना दिसत असून ज्यात एक महिला रूग्ण आपल्या एका लहान मुलासोबत बेडवर बसली आहे. तर त्या महिला रूग्णासोबत कोणीतरी बोलत आहे. मात्र बोलत असताना त्याचा पाय त्या रूग्णाच्या बेडवर आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलं केला जात आहे. हा फोटो IAS सोनकर (IAS Sonkar) यांचा असल्याचे समोर आले आहे. मात्र ते त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी होते. आणि ती त्यांची स्टाईल होती. मात्र आता हा फोटो व्हायरल केला जात असून तो सध्याचा आहे. आणि ही घटना ही आत्ताची असल्याचे म्हटले जात आहे.
यासंदर्भात नक्की सत्य काय आहे हे पाहण्याचा प्रय्त्न केला असता, IAS अधिकारी सोनकर हे त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकारी होते. तर त्यांची त्यावेळी ड्यूटी ही छत्तीसगडमध्ये होती. त्यावेळी त्यांची बोलण्याची स्टाईल ही तशीच होती. हा त्यावेळचा फोटो आहे. तो फोटो पोस्ट करत एका ट्विटर यूजरने लिहिले की, रूग्णाला भेटायला गेलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी सोनकर यांचा अंदाज. तसेच दुसऱ्या एका युजरंने लिहले की, “जैसे जहां के नदी नवारे, तैसे तहां के भरका. जैसे जाके बाप माहतारी तैसे ताके लरका. IAS अधिकारी झाले आहेत. मात्र संस्कारही येतीलच याची शाश्वती नाही. असं म्हणत लोक आता आयएएस अधिकाऱ्याच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या देशी म्हणीचा अर्थ असा आहे की, ज्या ठिकाणचे नद्या-नाले असतात, तसेच तेथील तलाव ही असतात. तर ज्यांचे पालक असे असतात तशी त्यांची मुले असतात.
याच ट्विटमध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही या घटनेची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. हा फोटो फेसबुकवरही खूप शेअर केला जात आहे. मात्र जेव्हा तथ्य पडताळण्यात आल्यावर हेच समोर आले की, हा फोटो जवळपास 6 वर्षे जुना आहे. त्यावेळी छत्तीसगडमध्ये काँग्रेस नसून भाजपचे सरकार होते आणि डॉ.रमण सिंग मुख्यमंत्री होते.
व्हायरल बातम्यांमधले चित्र उलटे शोधल्यावर आम्हाला ते “द व्हॉईस ऑफ सिक्कीम” नावाच्या फेसबुक पेजवर सापडले. येथे ते 5 मे 2016 रोजी पोस्ट केले होते. यावरून ही घटना अलीकडची नाही हे सिद्ध होते.
कीवर्ड सर्चच्या मदतीने शोध घेतल्यावर, आम्हाला 2016 साठी “डेक्कन क्रॉनिकल” चा अहवाल सापडला. हा अहवाल 10 मे 2016 रोजी प्रसिद्ध झाला. डॉक्टर बनलेले आयएएस अधिकारी जगदीश सोनकर यांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर बराच गदारोळ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. गदारोळ वाढत असताना जगदीश सोनकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्या वर्तनाबद्दल माफीही मागितली होती.
तसेच “india.com” नावाच्या वेबसाइटवर एक बातमी आहे. ज्यामध्ये जगदीश सोनकर यांची फेसबुक पोस्ट वाचली जाऊ शकते. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वागण्याबद्दल खेद व्यक्त केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, माझ्या या वागण्याला कोणत्याही प्रकारे न्याय्य ठरवता येणार नाही. आणि त्यासाठी मी बिनशर्त माफी मागतो. या कृतीमुळे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा कशी डागाळली हे मला माहीत आहे. मी सर्वांची माफी मागतो.
तसेच अधिक शोध घेतल्यावर इतर ही काही बातम्या मिळाल्या ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आपल्या मुख्य सचिवांना आयएएस सोनकर यांना शिष्टाचार शिकवा असे म्हटले होते.