भोपाळ : मध्य प्रदेशातील सिंगपूर रेल्वेस्थानकात मालगाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एक मालगाडी दुसऱ्या मालगाडीवर धडकली. यामुळे मालगाड्यांच्या इंजिनला आग लागली. यात एका लोको पायलटचा मृत्यू झाला आहे. दुसरा लोको पायलट आणि अन्य कर्मचारी या अपघातात जखमी झाले आहेत. राजेश प्रसाद असे मयत लोको पायलटचे नाव आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर झोनच्या शहडोल उपविभागातील सिंगपूर रेल्वे स्टेशनवर आज सकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर-कटनी रेल्वे विभागातील सिंगपूर स्टेशनवर कोळसा भरलेल्या मालगाडीचा सिग्नल ओव्हरशूट झाल्यामुळे इंजिनसह 9 डबे रुळावरून घसरले. त्यामुळे या मार्गावरील अप-डाऊन आणि मिडल अशा तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. त्याचबरोबर या अपघातानंतर रेल्वेने 10 गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
अपघातामुळे या मार्गावरील अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, काही गाड्या शॉर्ट टर्मिनेशन चालवण्यात येत आहेत.
1) 08740(BSP-SDL) बिलासपूर-शहडोल मेमू
2) 08749(SDL-ABKP-) शहडोल-अम्बिकापूर मेमू
3) 08758(ABKP-APR) अम्बिकापूर-अनुपपूर मेमू
4) 08759(APR-MDGR) अनुपपूर-मनेंद्रगढ मेमू
5) 08757(MDGR-ABKP) मनेंद्रगढ-अम्बिकापूर मेमू
6) 08750(ABKP-SDL) अम्बिकापूर-शहडोल मेमू
7) 08739(SDL-BSP) शहडोल-बिलासपूर मेमू
8) 18756(ABKP-SDL) अम्बिकापूर-शहडोल
9) 18755(SDL-ABKP) शहडोल-अम्बिकापूर मेमू
10) 18234(BSP-INDB) बिलासपूर-इंदूर नर्मदा एक्सप्रेस
20847 (DURG-UHP) ऊधमपूर एक्सप्रेस दोन तास उशिराने रवाना होईल.
1) 08747 (BSP-KTE) बिलासपूर–कटनी ट्रेन पेंड्रारोडपर्यंतच धावेल.
2) 11266 (ABKP-JBP ) अम्बिकापुर–जबलपूर ट्रेन बिजुरीपर्यंत धावेल.
3) 11265 (JBP-ABKP) जबलपूर–अम्बिकापूर ट्रेन जबलपूर मंडलपर्यंत धावेल.
15231 (BJU-G) बरौनी-गोंदिया ट्रेन
18208 (AII-DURG) अजमेर–दुर्ग ट्रेन