तीन हात, दोन डोकं, ओदिशात जुळ्या मुलींचा जन्म

| Updated on: Apr 13, 2021 | 11:47 AM

ओदिशाच्या (Odisha) केंद्रपाडा (Kendrapara) जिल्ह्यात रविवारी एका प्राइव्हेट रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या जुळ्या मुलींची दोन डोकं आणि तीन हात आहेत.

तीन हात, दोन डोकं, ओदिशात जुळ्या मुलींचा जन्म
Conjoined Twins
Follow us on

भुवनेश्वर : ओदिशाच्या (Odisha) केंद्रपाडा (Kendrapara) जिल्ह्यात रविवारी एका प्राइव्हेट रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या जुळ्या मुलींची दोन डोकं आणि तीन हात आहेत. मात्र, या दोन्ही मुलींचं शरीर एकच आहे (A Woman Give Birth To Conjoined Twins having two heads and three hands In Odisha).

या मुलींचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आहे. ही महिला दुसऱ्यांदा आई झाली आहे. या मुलींची डोकं पूर्णपणे विकसित झालेलं आहे. डॉक्टरांनुसार, ही एक दुर्मिळ चिकित्सा स्थिती आहे.

महिलेचं सिजेरिअन एका खाजगी रुग्णालयात झालं होतं. त्यानंतर तिला केंद्रपाडा जिल्ह्यातील मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ डॉक्टर देबाशीष साहू यांनी सांगितलं की दोन्ही नवजात दूध पीत आहेत.

मुलींची प्रकृती सध्या स्थिर आहे. केंद्रपाडाच्या डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर्स रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मते हे प्रकरण सियामीज ट्विन्सचं आहे. मुलीचे आई-वडील राजनगर क्षेत्राच्या कानी गावचे राहणारे आहेत. DHH केंद्रपाडा येथील पेडियाट्रिक कंसल्टेंट डॉक्टर देबाशीष साहू यांच्यामते, अल्ट्रासाऊंड केल्यानंतर या मेडिकल स्थितीबद्दल कळेल.

यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या आग्राच्या जय देवी रुग्णालयात अशा जुळ्या बाळांनी जन्म घेतला. या बाळाचे चार हात, चार आणि जुळलेले दोन डोकं होते. ही बाळं जुळी होती त्याशिवाय ती एकमेकांशी जुळलेलेही होते. दोन्ही नवजात बाळ हे पोटाच्या भागातून जुळलेले होते.

A Woman Give Birth To Conjoined Twins having two heads and three hands In Odisha

संबंधित बातम्या :

हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीची डोक्यालिटी, थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल