‘एका हातात स्प्रिट; दुसऱ्या हातात माचिस, दिल्लीत केजरीवालांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, हल्ल्यानंतर आपचा गंभीर आरोप

| Updated on: Nov 30, 2024 | 8:16 PM

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.

एका हातात स्प्रिट; दुसऱ्या हातात माचिस, दिल्लीत केजरीवालांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, हल्ल्यानंतर आपचा गंभीर आरोप
Follow us on

मोठी बातमी समोर येत आहे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी ग्रेटर कैलाश परिसरात केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.एका पदयात्रेदरम्यान हा हल्ला झाला. मात्र या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. हल्लेखोराने त्यांच्या अंगावर कुठला तरी पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्ष रक्षकांकडून या हल्लेखोराला लगेच ताब्यात घेण्यात आलं आहे.

दिल्लीची विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांची पदयात्रा सुरू आहे. आज ग्रेटर कैलाश परिसरामध्ये त्यांच्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान हा हल्ला करण्यात आला आहे. एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कुठलातरी तरल पदार्थ फेकला. या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत. या हल्ल्यानंतर आम आदमी पार्टीकडून भाजपवर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचं आपने म्हटलं आहे. यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

नेमकं काय घडलं? 

दिल्ली विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याकडून पदयात्रा सुरू आहेत. आज अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा ही ग्रेटर कैलाश भागात होती. पदयात्रा सुरू असताना समोरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर कुठला तरी तरल पदार्थ फेकून हल्ल्याचा प्रयत्न केला.  या हल्ल्यामध्ये केजरीवाल यांना कोणतीही दुखापत झाली नसून, ते सुरक्षित आहेत.

आपचा भाजपवर आरोप 

दरम्यान या हल्ल्यासाठी आपकडून भाजपला जबाबदार धरण्यात आलं आहे. भाजपनेच हा हल्ला घडून आणला असा आरोप आपने केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

या हल्ल्यानंतर आता आम आदमी पार्टीकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्यावर जो पदार्थ फेकण्यात आला तो स्प्रिट होता, हल्लेखोराच्या एका हातात माचीस होती तर दुसऱ्या हातात स्प्रिट होतं, केजरीवाल यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप आपचे आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे केजरीवाल यांच्या अंगावर जो पदार्थ फेकण्यात आला तो पाणी असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.