नवी दिल्ली : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. खरी शिवसेना कुणाची? यावरुन संघर्ष चांगलाच पेटला आहे. दोन्ही गट शिवसेनेवर आपला दावा करत आहेत. अशातच एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात मोठा दावा केला आहे.
आम्ही खरी शिवसेना आहोत असा यु्क्तीवाद कौल यांनी केला आहे. शिवसेना कोणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा आहे असेही कौल म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या संदर्भातचं अंतरीम याचिका आम्ही दाखल केली होती. निवडणूक आयोग स्वायत्त आहे. शिवसेना कोणाची हे फक्त निवडणूक आयोगच ठरवू शकते.
विधिमंडळात जरी अपात्र झाले असले तरी पक्षाचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे. आम्ही ठरवू की ओरीजनल पक्ष कोणता आहे.
अध्यक्षांचे अधिकार यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. ओरीजनल पक्ष कोणता हे निवडणूक आयोगचं ठरवणार असं निवडणुक आयोगाचे वकिल दातार यांनी केला आहे.
शिवसेनेसह बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. एकनाथ शिंदेच्या( Shiv Sena) बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना कुणाची? असा वाद निर्माण झाला. उद्धव ठाकरे आणि शिंदे गाटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेनेवर दावा करतानाच निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावण्याचाही शिंदे गटाचा प्रयत्न आहे.