VIDEO: नितीश म्हणाले आता अपघात कमी होतील, तोच त्यांना सोडून निघालेली इलेक्ट्रिक बस धडकली

| Updated on: Mar 02, 2021 | 8:01 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (2 मार्च) बिहारमध्ये इलेक्ट्रिक बसचं उद्धाटन केलं. यावेळी त्यांनी या बसेसचे अनेक फायदा सांगितले.

VIDEO: नितीश म्हणाले आता अपघात कमी होतील, तोच त्यांना सोडून निघालेली इलेक्ट्रिक बस धडकली
Follow us on

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (2 मार्च) बिहारमध्ये इलेक्ट्रिक बसचं उद्धाटन केलं. यावेळी त्यांनी या बसेसचे अनेक फायदा सांगितले. या बसच्या चालकांचं कौतुक करताना त्यांनी हे चालक इतके कुशल आहेत की आता बस अपघातातही घट होईल असाही दावा केला. मात्र, त्यांना बिहार विधानसभेत सोडताच या इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला. यामुळे नितीश कुमार यांच्या दाव्यावर जोरदार टीका होतेय. सोशल मीडियावर या बसच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर करत नितीश कुमार काही प्रमाणात ट्रोल होतानाही दिसत आहेत (Accident of Electric Bus of Bihar Government after dropping CM Nitish Kumar).

पत्रकार उत्कर्ष सिंह यांनी या अपघाताचा व्हिडीओ ट्विट करत म्हटलं, “इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन करताना नितीश कुमार यांनी या बस चालकांचं कौतुक केलं. म्हणाले इलेक्ट्रिक बसचे चालक इतके कुशल आहेत की आता बस अपघातात घट होईल. मात्र, याच बसमधून मुख्यमंत्री नितीश कुमार विधानसभा परिसरात उतरले आणि बसचा अपघात झाला.”

नितीश कुमार सरकारने (Bihar CM Nitish Kumar) निवडणुकीतील आपलं वचन पूर्ण करत बिहारमध्ये 82 इलेक्ट्रिक बस सुरु करण्याची घोषणा केली. याचंच आज उद्घाटन झालं. बिहारच्या परिवहन मंत्री शीला कुमारी म्हणाल्या, “इलेक्ट्रिक बस ही एक चांगली योजना ठरेल. यामुळे प्रदुषणही कमी होईल. या बसमध्ये 15 लग्झरी, 25 डिलक्स आणि 30 सेमी डिलक्स बसेसचा समावेश आहे. बिहारच्या विविध 43 मार्गांवर या बस चालतील. यामुळे राज्यातील 38 जिल्ह्यांचा राजधानी पाटणाशी संपर्क प्रस्थापित होईल.”

हेही वाचा :

देशातील पहिली इलेक्ट्रीक बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल

दिल्लीतून शाहनवाज हुसैन पाटण्यात गेले; थेट उद्योग मंत्री बनले

धरणे आंदोलनात गुन्हा केल्यास सरकारी नोकरी नाही; बिहार पोलिसांचे फर्मान

व्हिडीओ पाहा :

Accident of Electric Bus of Bihar Government after dropping CM Nitish Kumar