नवी दिल्ली : भ्रष्टाचार विरोधी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने भ्रष्टाचारावर आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात जगभरातील 180 देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या आधारावर रँकिंग करण्यात आलं आहे. 100 आकड्यांच्या आधारावर मूल्यांकन करुन देशांना रँकिंग देण्यात आली आहे. या वर्षी जारी करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये भारताचा 86 तर अमेरिकेचा 67 वा क्रमांक लागतो.(Corruption in India is lower than in Pakistan but has increased in two years)
यावर्षीच्या अहवालात अमेरिकेच्या रँकिंगमध्येही मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्याकाळात अमेरिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचं दिसून येत आहे. या रँकिंगमध्ये 71व्या स्थानावर असलेल्या उरुग्वेला दक्षिण अमेरिकेतील कमी भ्रष्टाचारी देश मानलं गेलं आहे. उरुग्वेनं आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात उरुग्वे अन्य देशांपेक्षा आघाडीवर राहिला आहे.
भ्रष्टाचार विरोधी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या रँकिंगमध्ये 100 पैकी 88 गुण मिळवून न्यूझिलंड पहिल्या क्रमांकावर आहे. 88 गुण मिळवून डेन्मार्कही न्यूझिलंडसह पहिल्या स्थानावर आहे. टॉप 10 देशांच्या यादीत न्यूझिलंड, डेन्मार्कनंतर सिंगापूर, स्वित्झर्लंड, फिनलॅन्ड आणि स्विडनने 86 गुण मिळवले आहेत. तर नॉर्वेने 84, नेदरलॅन्डने 80 गुण मिळवले आहेत. या 10 देशांमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप कमी आहे.
आशियाई देशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताचा 86व्या क्रमांकावर आहे. 78 व्या क्रमांकावर असलेल्या चीनची स्थिती भारतापेक्षा थोडी बरी आहे. दुसरीकडे पाकिस्तान 124 तर नेपाळ 117 व्या स्थानावर आहेत. संस्थेनं ज्या 188 देशांचा अभ्यास केला आहे, त्यातील दोन तृतियांश देशांनी 100 पैकी 50 पेक्षाही कमी गुण मिळवले आहेत.
या अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार 26 गुण मिळवणारा बांग्लादेश आरोग्य क्षेत्रात खूप कमी गुंतवणूक करतो. त्यामुळे या देशात औषध खरेदीमध्येही भ्रष्टाचार आढळून येतो. या प्रमाणात पाहिलं तर भारताची स्थाती पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशपेक्षा अधिक चांगली आहे. मात्र गेल्या दोन वर्षात या रँकिंगमध्येही घसरण पाहायला मिळत आहे. ETच्या एका अहवालानुसार 2018च्या अहवालात भारत 81व्या स्थानी होता. 2019च्या अहवानुसार भारताचं स्थान ७८ होतं. तेच स्थान 2020 मध्ये 80 तर आता 2021 मध्ये 86वं झालं आहे.
इतर बातम्या :
15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी
आर्थिक सर्व्हे म्हणजे काय रे भाऊ?; वाचा लेखाजोखा!
Corruption in India is lower than in Pakistan but has increased in two years