नवी दिल्ली : सरकारी योजनेचा फायदा (Government scheme) घेण्यासाठी लोकं काय करतील याचा नेम नाही. काही अतिहुशार महिलांनी आपली चतुराई दाखवत फायदा घेण्यासाठी जिवंत नवऱ्याला कागदोपत्री मारला असल्याचं प्रकरण उजेडात आलं आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण ज्यावेळी अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी उलट तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणी करीत असताना त्यांचे नवरे जिवंत असल्याचे आढळून आले. १२ महिलांनी खोटी कागदपत्रे दिल्याचे उजेडात आले आहे. १२ महिलांनी सरकारचं लाखो रुपयांचं नुकसान केलं आहे. त्या महिलांच्या (trending news) विरोधात अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अधिकारी (cross inquiry) या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत.
हा प्रकार झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील ठेठईटांग प्रखंड या भागातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तिथल्या १२ महिलांनी विधवा असल्याचं सांगून सरकारची फसवणूक केली आहे. ज्यावेळी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल झाली, त्यावेळी त्यांनी उलट तपासणी केली. विशेष म्हणजे विधवा पेन्शन मिळण्यासाठी त्यांनी हा प्रकार केला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्री देवी यांनी 9,000 रुपये, रीता देवी यांनी 10,000 रुपये, फूलवती देवी यांनी 8,000 रुपये, शनियारों देवी यांनी 8,000 रुपये, कष्टी देवी यांनी 8,000 रुपये, गुड्डी देवी यांनी 8,000 रुपए, ललिता देवी यांनी 8,000 रुपये, शहरी देवी यांनी 8000 रुपये, मैनी देवी यांनी 8,000 रुपये, तारा देवी यांनी 8,000 रुपये, पुनिया देवी यांनी 8,000 रुपये आणि गुड़िया देवी यांनी पेन्शनच्या नावाखाली 13,000 रुपये घेतले आहेत. या सगळ्या महिलांचे पती अजून जिवंत आहेत.
प्रखंड विकास पदाधिकारी यांनी सांगितलं की, त्या महिलांना गावातील सरपंचांनी कसल्याची प्रकारचं पत्र दिलेलं नाही. त्या महिलांनी ही कागदपत्र कुठून आणली आणि त्यांना ही आयडिया कुणी दिली याची चौकशी सुरु आहे.
पती जिवंत असताना सुध्दा विधवा पेन्शन मिळण्यासाठी महिलांनी आपल्या पतीला मारलं. झारखंड राज्यातील सिमडेगा जिल्ह्यातील हा प्रकार आहे. साधारण १२ महिलांनी एक लाख चार हजार रुपयांना फसवलं आहे.