नवी दिल्ली | 3 सप्टेंबर 2023 : चंद्रयान-3 च्या अद्भूत यशानंतर भारताचे पहिले सौर मिशन आदित्य एल-1 ( Aditya L-1 ) काल शनिवारी सु्र्याच्या दिशेने निघाले आहे. इस्रोने रविवारी आदित्य एल-1 च्या सद्यस्थितीबद्दल माहिती जारी केली आहे. आदित्य एल-1 योग्य दिशेने प्रगतीकरीत असून त्याने रविवारी सकाळी पहिला अर्थ बाऊंड मॅन्युव्हर पूर्ण केल्याचे सांगितले. आदित्यने पहिली कक्षा बदलली आहे, आता ते पृथ्वीपासून नव्या कक्षेत प्रवेशिले असून त्याचे किमान आणि कमाल अंतर 245 बाय 22459 किमी आहे. आता पुढील मॅन्युव्हर 5 सप्टेंबर रोजी आहे. भारतीय वेळेनूसार रात्री 03:00 वाजता आहे.
भारताची पहिली सुर्य मोहिमेंतर्गत आदित्य एल-1 यानाला श्रीहरिकोटा येथून शनिवारी सकाळी पीएसएलव्ही रॉकेटद्वारे लॉंच करण्यात आले. इस्रोने म्हटले की आदित्य एल-1 ही सुर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळातील वेधशाळा आहे. सुमारे 125 दिवसात म्हणजे साधारण चार महिन्यात ते पृथ्वीपासून 15 लाख किमीचे अंतर कापून पृथ्वी आणि सुर्यामधील एल-1 लॅंग्रेज पॉईंटवर पोहचणार आहे.
आदित्य एल-1 ला तब्बल 125 दिवस एल-1 पॉईंटवर पोहचायला लागणार आहेत. आदित्य एल-1 आधी 16 दिवस पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे. त्यानंतर आदित्य सुर्याच्या दिशेने त्याच्या मार्गाने रवाना होईल. या 16 दिवसात आदित्य पाच वेळा पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालणार आहे. आता पुढील कक्षेतील बदल 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेप्रमाणे हे पुढील मॅन्युव्हर रात्री उशीरा 3.00 वाजता बंगळुरु येथील कमांड सेंटरमधून होईल.
इस्रोने केलेले ट्वीट येथे पाहा –
Aditya-L1 Mission:
The satellite is healthy and operating nominally.The first Earth-bound maneuvre (EBN#1) is performed successfully from ISTRAC, Bengaluru. The new orbit attained is 245km x 22459 km.
The next maneuvre (EBN#2) is scheduled for September 5, 2023, around 03:00… pic.twitter.com/sYxFzJF5Oq
— ISRO (@isro) September 3, 2023
पीएसएलव्ही या इस्रोच्या भरवशाच्या रॉकेटमधून आदित्य एल-1 ला पृथ्वीच्या आतील कक्षेत स्थापित केले होते. आज त्याच्या थ्रस्टरमध्ये एक्सटर्नल फोर्स देऊन आदित्य एल-1ची कक्षा बदलली आहे. आदित्य 15 लाख किमीचे अंतर गाठणार आहे. आदित्यला त्यासाठी 128 दिवस लागू शकतात.
आदित्य एल-1 सुर्याचा कणांचा, सौर वादळांचा, सुर्याच्या कोरोनाचा तसेच अतिनील किरणांचा अभ्यास करणार आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाच वर्षे दोन महिने राहणार आहे. यासाठी 378 कोटी रुपयांचा खर्च या मिशनवर झाला आहे. आतापर्यंत अमेरिका, जर्मनी आणि युरोपीयन स्पेल एजन्सीने सुर्याचा अभ्यास करण्यासाठी यानं पाठविली आहे. आतापर्यंत 22 सुर्य मोहीमा पार पडल्या आहे. त्याची सर्वाधिक 14 मोहिमा नासाच्या आहेत. साल 1994 मध्ये युरोपीयन स्पेस एजन्सीने त्यांचे पहिले सु्र्य मिशन पाठविले होते. भारताचे हे पहिले सुर्य मिशन आहे.