नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : सुर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-1 पीएसएलव्ही – एक्सएल रॉकेटद्वारा सुर्याकडे रवाना झाले आहे. पीएसएलव्ही रॉकेटचे हे 59 वे उड्डाण आहे. तर एक्सएल आवृत्तीचे 25 वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर येथून शनिवारी सकाळी आदित्य एल-1 सुर्याच्या दिशेने यशस्वीपणे रवाना झाले असून या रॉकेटचे सर्व चार टप्पे सुरळीत पार पडले आहेत. आता आदित्य एल-1 ला अंतराळात नेणारे पीएसएलव्ही – एक्सएल रॉकेट 145.62 फूट उंच आहे. त्याचे वजन 321 टन असून ते चार टप्प्याचे रॉकेट आहे. हे रॉकेट इस्रोचे सर्वात भरोसेमंद रॉकेट आहे.
पीएसएलव्ही रॉकेट आदित्य एल-1 ला पृथ्वी आणि सूर्यामधील 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 बिंदूपर्यंत सोडणार आहे. यासाठी 125 दिवसांचा म्हणजे साधारण चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एल-1 बिंदूला म्हणजे लॅग्रॅन्जिअन पॉईंट पृथ्वी आणि सूर्याचे गुरुत्वीय बल संतुलित रहाते अशा पाच बिंदूपैकी एल-1 बिंदूवर पोहचले आहे. सौर वारे आणि सुर्यप्रभा मंडलाचा अभ्यास करणार आहे. आदित्य – एल-1 याचे वजन 1480.7 किलोग्रॅम आहे. शनिवारी सकाळी 11.50 वाजता आदित्य एल-1 अवकाशात झेपावले आहे. आदित्य एल-1 वर अगदी सुर्याजवळ जाणार नाही. ते पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटरवर एल-1 पॉईंटवरुन दुरुन निरीक्षण करणार आहे.
पीएसएलव्ही रॉकेट आतापर्यंत 58 लॉंच केले असून त्यातील 55 लॉंचिंग यशस्वीपणे करीत उपग्रहांना ऑर्बिटमध्ये पोहचविले आहे. त्यातील केवळ दोन अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे या रॉकेटचा सक्सेस रेट 94 टक्के इतका आहे. भारताचे हे पहिले सौर अभ्यास यान आहे. भारतापूर्वी अमेरिका, जर्मनी आणि युरोपीय देशांनी सौर मोहिमा राबविल्या आहेत. या देशांनी 22 सौर मोहिमा राबविल्या आहेत.
एल-1 पॉईंटवर यानाला पोहचविणे कठीण काम आहे. याचा फायदा असा की सूर्याचा कोणताही अडथळा न येता आदित्य-एल-1 ला सूर्याचा सातत्य पूर्ण अभ्यास करता येणार आहे. हा हॅलो ऑर्बिटमध्ये आदित्य एल-1 ला सारा डाटा रियल टाईम मिळणार आहे. लॉंच झाल्यानंतर 16 दिवस आदित्य एल-1 पृथ्वीच्या फेऱ्या मारणार आहे. पाच ऑर्बिट मॅन्युव्हर होणार आहेत. त्यास वेग येण्यासाठी हे केले जाते. त्यानंतर एल-1 पॉइंटवर ते पोहचणार आहे. त्याचा हा प्रवास 109 दिवसाचा असणार आहे. तेथे एक ऑर्बिट मॅन्युव्हर केले जाणार आहे. एल-1 पॉईंटच्या चारही बाजूला फिरण्यासाठी हा मॅन्युव्हर केला जाणार आहे.