देश का भविष्य तय होने की बात…, आदित्य ठाकरे, तेजस्वी यादवांच्या भेटीवर नेत्यांची प्रतिक्रिया..

| Updated on: Nov 23, 2022 | 4:09 PM

आदित्य ठाकरे यांच्या भेटविषयी मत व्यक्त करताना तेथील शिवसैनिकांनी सांगितले की, बुद्ध आणि चाणक्य यांच्या धरतीवर या युवा नेत्यांची भेट होत आहे.

देश का भविष्य तय होने की बात..., आदित्य ठाकरे, तेजस्वी यादवांच्या भेटीवर नेत्यांची प्रतिक्रिया..
Follow us on

पाटणाः देशातील दोन राज्यातील दोन युवानेत्यांची भेट होत आहे. त्यामुळे राजकारणातील अनेक नेत्यांच्या नजरा याकडे लागून राहिल्या आहेत. आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर आहेत, त्यांचे आता बिहारची राजधानी पाटणा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट होणार असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी आज पाटणा विमानतळावर जंगी स्वागतासाठी तयारी करण्यात आली होती. त्यांच्या भेटीविषयी तेथील शिवसैनिकांना कमालीची उत्सुकता असल्याची भावना त्यांनी टीव्ही नाईनशी बोलताना व्यक्त केली आहे.

 

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर असल्यामुळे विरोध आणि समर्थन या दोन्ही गोष्टी घडत आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या भेटविषयी मत व्यक्त करताना तेथील शिवसैनिकांनी सांगितले की, बुद्ध आणि चाणक्य यांच्या धरतीवर या युवा नेत्यांची भेट होत आहे.

त्यामुळे निश्चितच ही मोठी गोष्ट आहे. दोन राज्यातील महत्वाचे दोन युवा नेत्यांची भेट होत असल्याने बिहारमधील नेत्यांनी ये देश का भविष्य तय होने की बात हो रही है अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरे यांचा बिहार दौरा ठरल्यानंतर ठाकरे गटावर आणि आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपने टीका केली होती. भाजपने टीका करताना म्हटले आहे की, लालू प्रसाद यादव यांनी तर हिंदूत्वाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे तेजस्वी यादव यांची कशी काय भेट घेत आहेत.

त्यावर बिहारमधील नेत्यांनी सांगितले की, हिंदूत्व हा मुद्दा आता बाजूला ठेवला असून तो मुद्दा आणि आजची आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांची भेट या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे हिंदूत्वाचा मुद्दा आता गैर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.