पाटणाः ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट होत असल्याने राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. बु्द्ध आणि चाणक्यच्या धरतीवर या दोघा नेत्यांची भेट होत असल्याने भविष्यातील राजकीय गणित काय असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आदित्य ठाकरे बिहारची राजधानी पाटणा येथे पोहचल्यानंतर तेथील शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
त्यानंतर बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेताना त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली. आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्तीही त्यांनी भेट देण्यात आली.
आदित्य ठाकरे यांनी या भेटीविषयी बोलताना सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे काम चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्याचे ठरवले होते असंही त्यांनी सांगितले.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावेी त्यांनी सांगितले प्रत्येक भेटीकडे तुम्ही राजकीय भेट म्हणून बघू नका. ही एक चांगल्या हेतूने घेतलेली भेट आहे. त्यांचे काम चांगले चालू असल्याने त्यांची भेट घेण्याचे ठरवले होते असंही त्यांनी सांगितले.
पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ये दोस्ती आगे चलती रहेगी असं म्हणत त्यांनी संविधान बचाव आणि लोकशाही वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती असंही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी याही उपस्थिती होती. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही भेट घेतली आहे का.असा सवाल केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगत फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे असंही त्यांनी सांगितले.