दिल्लीत आयएएस कोचिंग सेंटरमध्ये पावसाच्या पाणी साचून तीन आयएएसचे प्रशिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता सरकारला उशीरा जाग आली आहे. त्यामुळे देशभरातील आयएएस प्रशिक्षण केंद्रांवर धाडी सुरु झाल्या आहेत. दिल्लीतील घटनेने सर्वच कथित आयएएस ट्रेनिंग सेंटर सरकारच्या रडारवर आली आहेत. बिहारच्या पाटणा येथील खान जी.एस. रिसर्च कोचिंग सेंटरला जिल्हा प्रशासनाने नोटीस चिकटवली आह. तसेच कोचिंग बंद करण्यास सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणात खान सर यांना देखील नोटीस पाठविली जाणार आहे. अनेक त्रूटी या क्लास सेंटरमध्ये आढळल्याने ते सिलबंद करण्यात आले आहे.
बिहार प्रशासनच्यामते पाटणा येथील कोचिंग सेंटरमध्ये पुरेशी हवा खेळती नसल्याचे उघडकीस आले आहे. आत शिरण्याचे आणि बाहेर पडण्याचे चांगली व्यवस्था नसल्याचे देखील आढळले आहे. येथील बैठक व्यवस्था तसेच क्लासची इमारतीतील जागा अशा अनेक त्रूटी आढळल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी समिती नेमली होती. त्या समितीला अनेक त्रूटी आढळल्या आहेत. बिहार कोचिंग रेग्युलेशन अॅक्टचे पालन न केल्याने ही कारवाई झाल्याचे आढळले आहे.
या प्रकरणात खान सरांनी पाटणा येथील त्यांच्या कोचिंग सेंटरमधील सर्व त्रूटी काही दिवसात दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. आपण येत्या दोन दिवसात नोटीसीला उत्तर देऊ असे खान सरांनी आश्वासन दिले आहे. दिल्लीतील कोंचिग सेंटरमध्ये पावसाच्या पुराचे पाणी साचल्यानंतर तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पाटणा प्रशासनाने एक्शन केले आहे. उप विभागीय न्यायदंडाधिकारी ( एसडीएम ) श्रीकांत कुंडलिक खांडेकर पथकासोबत कोचिंग सेंटरवर कारवाई करीत आहेत.