पटना : आजकाल बहुतेक लोक सरकारी नोकरी मिळवण्यावर मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लोक हवे तेवढे प्रयत्न करत असतात. त्यात सरकारी नोकरी मिळाल्यानंतर जो आनंद मिळतो तो शब्दातही कुणाला सांगता येत नाही. तर आता अशीच एक चकीत करणारी गोष्ट समोर आली आहे. एक गाव असं आहे जिथे देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या इतक्या वर्षांनंतर आज पहिल्यांदा एका तरूणाला सरकारी नोकरी मिळाली आहे.
किशनगंजच्या दिघलबँक सातकौआ पंचायतीच्या कश्टोला हरिभिचट्टा गावात राहणारा मनोज कुमार सिंह यानी बीपीएससी टीआरई परीक्षा उर्तीण केली आहे. त्यामुळे आता ते पहिली सरकारी नोकरी मिळवणार आहेत. विशेष म्हणजे आपल्या गावात शिक्षक म्हणून सरकारी नोकरीत रूजू होणारा मनोज हा पहिला तरूण ठरला आहे.
मनोज कुमार सिंह याच्या गावातील लोकांना शिक्षणाची जास्त आवड नाहीये. त्याच्या गावात आत्तापर्यंत फक्त 7 मुले पदवीधर झाली आहेत. तसंच या गावातील मुले जास्तीत जास्त 10 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेतात. त्यानंतर ते पंजाब किंवा दिल्लीला पैसे कमवण्यासाठी जातात.
दरम्यान, मनोज कुमार सिंह यांनी अशा स्थितीत 10वी पूर्ण करून कोणत्याही परिस्थिती सरकारी नोकरी मिळवायची असं ठरवलं होतं. जेणेकरून त्यांच्या गावातील तरूणांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे मनोज यानी किशनगंजमध्ये राहून दहावी आणि बारावी पूर्ण केली आणि 2011 पासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तर आज त्यांनी बीपीएससी टीआरई परीक्षा उर्तीण केली असून सरकारी नोकरी मिळवली आहे.