लग्नानंतर बायकोला फिरायला घेऊन गेला, पतीच्या त्या कृतीमुळे उद्ध्वस्त..

| Updated on: Nov 21, 2024 | 1:57 PM

लग्नानंतर अनेक जोडपी बाहेर फिरायला जातात.नव्या जीवनाची स्वप्न पहात एक तरूणी अशीच तिच्या पतीसोबत फिरायला बाहेर गेली, तेही चक्क कतारमध्ये.. मात्र तिथे गेल्यावर तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. ती हादरलीच.. नेमक काय झालं तिच्यासोबत ?

लग्नानंतर बायकोला फिरायला घेऊन गेला, पतीच्या त्या कृतीमुळे उद्ध्वस्त..
Follow us on

लग्नानंतर अनेक जोडपी बाहेर फिरायला जातात.नव्या जीवनाची स्वप्न पहात एक तरूणी अशीच तिच्या पतीसोबत फिरायला बाहेर गेली, तेही चक्क कतारमध्ये.. मात्र तिथे गेल्यावर तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. पतीच्या एका कृतीमुळे ती अक्षरश: हादरून गेली. काय आहे प्रकरण ?

ही घटना बिहारच्या पाटणा येथील आहे, वाचून तुम्हालाही धक्का बसेल. नुकतंच लग्न झालेली ती तिच्या पतीसोबत बाहेर फिरायला गेली. तिचा पती तिला फिरवण्याच्या बहाण्याने कतारमध्ये घेऊन गेला, पण तिथे जाऊन त्याने आपल्या पत्नील दुसऱ्या पुरुषालाच विकून टाकलं आणि तो मात्र स्वत: भारतात परतला. एवढचं नव्हे कर त्याने पोस्टाद्वारे आपल्या पत्नीला तीन तलाक दिला. संकटात सापडलेल्या त्या महिलेने सिक्युरिटी गार्डच्या मदतीने कशीबशी सुटका केली आणि ती भारतीय दूतावासात जाऊन पोहोचली, आणि कशीबशी भारतात परत आली.

मायदेशी परतल्यानंतर त्या महिलेने आपबीती सुनावली, तिची कहाणी ऐकून सर्वांनाच धक्का बसला. अखेर त्या तरूणीने धैर्य दाखवत तो नराधम पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण दिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पाटणा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणीचा विवाह शाहबाज हसन नावाच्या तरुणाशी 2021 मध्ये झाला होता. नवरामुलगा हा वीज विभागात सरकारी कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. मात्र लग्नानंतर ती सासरी गेली तेव्हा तिला काही वेगळच समजलं. तिचा नवरा तर एका एनजीओमध्ये काम करत होता. नंतर तो कतारमध्ये गेला. 2021 च्या ऑक्टोबरमध्ये त्याने पत्नीलाही तिथे बोलवले आणि दोघे तिथेही राहू लागले.

10 लाखांत सौदा

तिथे रहात असताना त्या महिलेची प्रसूती झाली. मात्र त्यानंतर लागलीच तिच्या पतीन कतारच्या शेखशी तिचा 10 लाखांत सौदा केला. त्याच्या या क्रूर कृत्यामुळे हादरलेल्या महिलेने सिक्युरिटी गार्डच्या मदतीने कशीबशी सुटका करून घेतली.त्याच गार्डच्या मदतीने तिने रतीय दूतावासाशी संपर्क साधला. भारतीय दूतावासाच्या मदतीने तिने स्वत:ला वाचवले आणि अखेर ती सुखरूप घरी परत आली. सासू-सासऱ्यांनाही माझा स्वीकार करण्यास नकार दिला, असा आरोप महिलेने केला आहे.

पोलिसांनी केली कारवाई

या संपूर्ण प्रकरणाबाबत तरुणीने दिघा पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तेथए वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून त्या तरूणाला कायदेशीर मदत दिली जात आहे. केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या सासरच्या मंडळींना घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.