हम भी है जोश में…दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदासाठी कंबर कसली..

| Updated on: Sep 21, 2022 | 7:28 PM

गेल्या महिन्यातच दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या पक्षाध्यक्ष पदाबाबत मोठा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, राहुल गांधींना अध्यक्षपदासाठी जबरदस्ती करता येणार नाही,

हम भी है जोश में...दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदासाठी कंबर कसली..
Follow us on

नवी दिल्लीः काॅंग्रेस अध्यक्ष (Congress President) पदाचा घोळ काही संपायचे नाव घेत नाही. अशोक गेहलोत यांच्या नंतर दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचाही काँग्रेस अध्यक्ष पदासाठी इशारा दिल्याने आता आणखी एक नाव चर्चेत आले आहे. हे नाव जर पुढे आलेच तर मात्र काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Election 2022) अधिकच रंजक होणार आहे.काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी सोनिया गांधींसोबत निवडणूक लढवण्यासाठी एनओसीही मिळवली आहे, तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्याय वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीत व्यस्त आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी दोन नावांची चर्चा असली तरी या शर्यतीत दिग्विजय सिंहही मागे राहिले नाहीत. त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, तुम्ही मला या शर्यतीतून बाहेर का समजत आहात. त्यामुळे त्यांचा हा बोलण्याचा इशारा आणखी एक नाव काँग्रेस अध्यक्ष पदाच्या यादीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मात्र त्यांनी जर ठरवलेच असेल तर मात्र ही निवडणूक अधिकच रंजक होणार असल्याचे दिसत आहे.

उदयपूरच्या सभेत काँग्रेसने एक व्यक्ती एक पदाचा नारा लावला होता. तरीही अशोक गेहलोत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

त्यानंतर दिग्विजय सिंह यांना जेव्हा पत्रकारांनी या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी घराण्यातील एकही व्यक्ती नाही मग ही चिंतेची बाब नाही का असा सवाल केला.

तेव्हा मात्र दिग्विजय सिंह यांनी या निवडणुकीत कोणीही भाग घेऊ शकतो आणि कोणीही लढवू शकतो असं स्पष्टपणे सांगितले.

गेल्या महिन्यातच दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींच्या पक्षाध्यक्ष पदाबाबत मोठा खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, राहुल गांधींना अध्यक्षपदासाठी जबरदस्ती करता येणार नाही, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते.

त्यांना आता अध्यक्षपद स्वीकारायचे नसेल, तर त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती नसल्याचेही त्यांना सांगितले होते.

गेहलोत राहुल गांधींचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र गेहलोत यांनीच बुधवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आपण इच्छूक असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

यावेळी त्यांनी राहुल गांधींना पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी मीही त्यांना विनंती करणार असून त्यांच्याबरोबर बोलूनच पुढचा निर्णय सांगितला जाईल असंही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार 22 सप्टेंबरला अधिसूचना जाहीर होणार आहे. तर 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर असून एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.