कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यात आमुलाग्र बदल झाल्याचे अनेक प्रसंगातून जाणवत आहे. त्यांनी संसदेत केलेले भाषण प्रचंड प्रभावी झालेले आहे. राहुल गांधी यांना अलिकडे 26 जुलै रोजी एका अब्रुनुकसानीच्या प्रकरणात सुल्तानपूर यथील कोर्टात हजर राहायचे होते. कोर्टातील हजेरीनंतर राहुल गांधी परताना एका चर्मकाराच्या दुकानात शिरले. त्याची बोलून राहुल गांधी यांनी त्याच्या धंद्यातील बाबींशी हितगुज केली. त्यानंतर त्यांनी चर्मकार चेतूराम यांच्याकडून चप्पल कशी शिवायची याची कला शिकून घेतली. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायलर झाला आहे. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर या चर्मकाराचं भाग्य एका रात्रीत बदललं. राहुल गांधींनी शिवलेली चप्पल पाहण्यासाठी लोकांच्या दुकानात रांगा लागल्या आहेत. ही चप्पल विकत घेण्यासाठी कितीही रक्कम मोजण्यास लोक तयार आहेत.
राहुल गांधी नेहमीच समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटत असतात. कधी त्यांनी सुतारकाम करणारे तर कधी विश्वकर्मा यांच्याकडे त्यांनी ट्रेनिंग घेत त्यांचे दु:ख आणि व्यवसायातील अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत.सुल्तानपूर येथील कोर्टात हजेरी लावल्यानंतर राहुल गांधी यांनी चर्मकार चेतराम यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर त्यांनी एक चप्पल देखील शिवून पाहीली.राहुल गांधी यांच्या भेटीनंतर त्यांचे भाग्यच बदलले. राहुल गांधी यांनी शिवलेल्या चप्पलला पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. काही जणांनी या चप्पलला विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. चेतराम यांनी सांगितले की ही चप्पल खरेदी करण्यासाठी मला दररोज फोन येत आहेत. लोक हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. एके दिवशी काही लोक एक ते दोन लाख रुपायांची कॅश घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले.
चर्मकार चेतराम यांनी या चप्पलची विक्री करण्यास साफ नकार दिला आहे. राहुल गांधी यांनी शिवलेली चप्पल आपल्यासाठी अनमोल आहे.त्याचे मोलच होऊ शकत नाही. कोणी करोडो रुपये दिले तरी मी ही चप्पल देणार नाही असे चेतराम यांनी म्हटले आहे. ते या चप्पलला फ्रेम करुन दुकानात लावणार आहेत.जोपर्यंत आपण जीवंत आहोत तोपर्यंत ही चप्पल माझ्यासमोर रोज दिसायला हवी अशी इच्छाच त्यांनी बोलून दाखविली आहे. राहुल गांधी यांनी चेतराम यांची भेट घेतल्यानंतर चप्पल शिवण्याचा अनुभव घेतला आणि त्यांना नंतर कुरीयरने एक खास भेट पाठवून दिली. राहुल गांधी यांनी चेतराम यांना चप्पल आणि बुट शिवणारी इलेक्ट्रॉनिक मशिन पाठवून दिली असल्याचे चेतराम यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.