नवी दिल्ली : अग्निपथ योजनेवरुन (Agneepath Scheme Row) देशभरातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अशातच अग्निपथ योजनेबाबत फसवी माहिती देणाऱ्या व्हॉट्सअप ग्रूपवर कारवाई करण्यात आली आहे. एकूण 35 व्हॉट्सअप ग्रूपवर (WhatsApp Groups) बंदी घालण्यात आल्याची माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. तर एकूण दहा लोकांना आतापर्यंत अग्निपथ योजनेची दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबाबत अटक (Police Arrest) करण्यात आलीय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं अग्निपथ योजनेबाबत चुकीच्या गोष्टी पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिलो आहेत. आतापार्यंत 50 व्हॉट्सअप ग्रूपवरही करडी नजर ठेवली जात असून सखोल तपास केला जातोय. संशयास्पद आणि दोषी व्हॉट्सग्रूप्सवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आलाय. तसंच गृह मंत्रालयाकडून व्हॉट्सअप फॅक्ट चेकिंगसाठी 8799711259 हा नंबरदेखील जारी केलाय.
देशभरात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. अग्निपथ योजनेविरोधातील तरुणांमधील रोष कायम आहे. त्याविरोधात संप पुकारण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केलाय.
Ministry of Home Affairs banned 35 WhatsApp groups for spreading fake news on ‘Agnipath’ scheme and ‘Agniveers’, today: Govt sources pic.twitter.com/0I9AoonDWp
— ANI (@ANI) June 19, 2022
अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रचंड रोष बिहारमध्ये पाहायला मिळाला. बिहार सरकारने अग्निपथ योजनेविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनाची गंभीर दखल घेत 12 जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवाही बंद केलीय. तसंच अनेक आंदोलकांची धरपकडही करण्यात आलीय. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांचे मोबाईल फोन तपासण्यात आलेत. त्यातून या आंदोलनामागे या तरुणांच्या कोचिंग क्लासचा मोठा हात असल्याचं समोर आलंय. बिहार, यूपीतील आंदोलनात अनेक ठिकाणी ट्रेन जाळण्यात आल्या होत्या. तसंच जागोजागी जाळपोळ, तोडफोडदेखील करण्यात आली होती.
अग्निपथ योजनेतीला काही बाबींवरुन तरुणांनी संताप व्यक्त केला होता. अग्निवीरांना पेन्शन दिली न जाणार असल्यामुळे लष्कर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये नाराजी पसरली होती. चार वर्षांच्या सेवेसाठी अग्निवीरांना लष्करात सामावून घेण्याच येईल, अशा या योजनेची घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती.
तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी सातत्यानं केंद्र सरकारकडून प्रयत्नही केले जात आहेत. वयोमर्यादेच्या वाढीसह अनेक गोष्टींचा लाभ तरुणांना मिळावा, यासाठी गृहमंत्रालयासोबत संरक्षण मंत्रालयानेही घेतला होता. त्याचप्रमाणे रविवारी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषदत घेत भविष्यात लष्कर भरती ही अग्निपथ योजनेच्या माध्यमातूनच केली जाईल, असंही स्पष्ट केलं होतं.