कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठी क्रांती आणू शकते. हा आधुनिक तंत्रज्ञान गेम चेंजर असल्याचे मत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मांडले. एआयचा भारतीय न्याय व्यवस्थेत वापर केल्या जाऊ शकतो, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत एआयविषयी जवळपास प्रत्येक क्षेत्रात चर्चा सुरु आहे. एआय किती फायदेशीर आणि किती नुकसानकारक आहे, याची चर्चा सुरु आहे. याबाबत देशाचे सरन्यायाधीशांनी पण त्यांचे मत मांडले आहे. काय म्हणाले चंद्रचूड…
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेत तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे मत मांडले. त्यांनी एआयच्या आवश्यकतेवर पण भर दिला. न्यायीक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि एआयचा वापर हा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याचा काळ हा बदल स्वीकारण्याचा आहे, आपल्याला तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर कसा करता येईल हे बघावे लागेल, असे ते म्हणाले. त्यांनी एआयच्या वापरासंबंधी इशारा पण दिला आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होता कामा नये, असा इशारा पण त्यांनी दिला.
एआयचा चुकीचा वापर