Sasikala Quit Politics चेन्नई : तामिळनाडूत ऐन विधानसभा निवडणुकीआधी मोठी राजकीय खळबळ उडालीय. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि AIADMK च्या नेत्या शशिकला यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. शशिकला यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केलंय. त्यात त्यांनी आपल्या समर्थकांना आणि AIADMK पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचं आणि DMK ला पराभूत करण्याचं आवाहन केलंय (AIADMK leader Sasikala quit Politics before Tamilnadu Assembly Election 2021).
शशिकला यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे, “तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचं सरकार बनावं म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहिल आणि जयललिता यांच्या मार्गावर चालत राहिल. AIADMK च्या कार्यकर्त्यांनी एकजूट रहावं आणि DMK ला निवडणुकीत पराभूत करावं.”
Tamil Nadu: In a statement, VK Sasikala says she is quitting public life; asks the AIADMK cadre to stand united and ensure DMK is defeated in forthcoming Assemlby elections.
(file photo) pic.twitter.com/qEXfWLkXhq
— ANI (@ANI) March 3, 2021
करुणानिधी आणि जयललिता या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत पहिलीच निवडणूक
तामिळनाडूसह देशातील 4 राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे या पाचही राज्यांमधील राजकारणाचा पारा चढलाय. या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तामिळनाडूमध्ये तर करुणानिधी आणि जयललिता या दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच राज्याची निवडणूक होत आहे. त्यामुळे कोणता पक्ष सत्तेत येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे यंदा या निवडणुकीत प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांच्याही पक्षाने एन्ट्री केलीय. त्यामुळे त्यांचा पक्षही किती परिणाम करतो हे पाहावं लागणार आहे.
तामिळनाडूत AIADMK ची भाजपप्रणित एनडीएत एंट्री!
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेने एनडीएमध्ये एंट्री केली होती. भाजप आणि एआयडीएमके तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. तामिळनाडूतील एकूण 39 लोकसभेच्या जागांपैकी भाजपला पाच जागा देण्याचा निर्णय झाला होता.
हेही वाचा :
दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाची भाजपप्रणित एनडीएत एंट्री!
पुशअप्स, समुद्रात स्विमिंग आणि अॅब्स… ‘या’ कारणांमुळे सर्वत्र राहुल गांधींच्या फिटनेसची चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांवर हल्ले, राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल सुरुच
व्हिडीओ पाहा :
AIADMK leader Sasikala quit Politics before Tamilnadu Assembly Election 2021