नवी दिल्लीः दिल्लीतील अक्षरधाम मेट्रा स्टेशनवरुन (Akshardham Metro Station) उडी घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न करणारी मुलगी ही पंजबामधील होशियारपुरीमधील (Hoshiyarpuri) राहणारी होती. पोलीस अधिकारी जितेंद्र मणी यांनी सांगितल्याप्रमाणे हरियाणातील गुरुग्राममध्ये ही मुलगी काम करत होती, आणि नुकतीच तिची नोकरी गेली होती. ज्या पंजाबमधील 25 वर्षाच्या मुलीने मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला तिला स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी काह अधिकाऱ्यांनी इमारतीच्या खाली चादर लावून तिला वाचवण्यासाठी थांबले होते. तिने इमारतीवरुन उडी मारलीही मात्र अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे चादर लावून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला. इमारतीवरुन उडी मारल्यानंतर तिला चादरीमध्ये झेलण्यात आले मात्र ती गंभी जखमी झाली होती. इमारतीवरुन खाली पडल्यामुळे शरीरातील अनेक ठिकाणची हाडे मोडली होती.
पंजाबमधील ज्या मुलीने इमारतीवरुन उडी मारून नंतर मृत झालेल्या मुलीचे निधन झाले आहे ते तिचे नोकरी गेल्यामुळे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अजून ठोस कारण मिळू शकले नाही. तिच्या जवळ कोणतीही सुसाईट नोटही मिळू शकली नाही. ती आधी गुरुग्राममध्ये काम करत होती, ती नोकरी सुटल्यानंतर ती कुठेही नोकरी करत नव्हती. त्यामुळे तिने आत्मत्येचं पाऊल का उचललं याचा शोध पोलीस घेत असले तरी आणखी दुसरे काही कारण आहे का याचाही शोधही सुरु आहे.
होशियारपूरमधील कमालपूर येथील मोहल्यात राहणारी ही मुलगी होती. तिच्या आजीने सांगितले की,तिच्या या नातीचे नाव दिया होते, तिला बोलता आणि ऐकूही येत नव्हते. तिच्या आजीने आणखी एक धक्कादायक माहिती पोलिसांनी सांगितली की, माझ्याशिवाय तिला आणि तिचे आई वडील, तिचा भाऊ यापैकी कोणालाही बोलता आणि ऐकू येत नव्हते. आत्महत्येचं कारण काय असू शकतं असं त्या आजीला विचारण्यात आले तेव्हा तिच्या आजीने सांगितले की, का आत्महत्या केली ते सांगता येणार नाही. आता तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दियाचे कुटुंबीय दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
दियाने गुरुवारी मेट्रो स्टेशनवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्टेशनवरील अधिकाऱ्यांनी तिला समजवण्याचा प्रयत्न करुन खाली उतरण्याची विनंती केली होती. मात्र अधिकाऱ्यांचे न ऐकता तिने स्टेशनवरुन खाली उडी मारली. त्यानंतरही काही अधिकाऱ्यांनी चादरीवर झेलून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती जमिनीवर आदळल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिला लाल बहाद्दूर रुग्णालयात दाखल केले गेले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
देवेंद्र फडणवीसांच्या 14 ट्विटनंतर हिंदू महासभेचे आनंद दवे यांचे भाजपाला 17 प्रश्न
Sharad Pawar Live : हो, शंभर टक्के खरं आहे, फडणवीसांच्या आरोपाला शरद पवारांचं थेट अनुमोदन