मुंबई, देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील आघाडीचे उद्योगपती व रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आपल्या महागड्या व लग्झरीयस कार कलेक्शनमध्ये अजून एका कारची भर घातली आहे. अंबानी परिवाराने तिसर्या रोल्स रॉयस कलिनन (Rolls Royce Cullinan) कारचे स्वागत केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही कार देशातील सर्वाधिक महागडी कार ठरली आहे. या लग्झरी कारला तब्बल 1 कोटी रुपयांचा पेंट लावण्यात आला आहे. रोल्स रॉयसची कार महागड्या किमती आणि ग्राहकांनुसार कस्टमायझेशनसाठी (Customization) प्रसिध्द आहेत. ग्राहक त्यात आपल्या पसंतीनुसार, अनेक बदल करु शकतात. या लेखातून अंबानी यांच्या नवीन कलेक्शन कार कलिननबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
रोल्स रॉयस कलिननला मुकेश अंबानी यांच्या सिक्योरिटी कारच्या फ्लीटमध्ये मर्सिडीज AMG आणि MG Gloster सोबत स्पॉट करण्यात आली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला पीटीआयने दावा केला होता, की रोल्स रॉयस कलिननची किंमत 13.14 कोटी रुपये असू शकते. या कारची बेस प्राइस 6.8 कोटी रुपये आहे. कस्टमायझेशनच्या कारणामुळे याचा रेट वाढला आहे.
अंबानी यांनी आपल्या नवीन कारमध्ये कस्टमायझेशन अंतर्गत काय बदल केलेत याबाबत सध्या कुठलीही माहिती मिळालेली नाही. परंतु अंबानी यांनी कारला चांगला लूक देण्यासाठी टस्कन सन कलर शेडमध्ये पेंट केले आहे. यामुळे गर्दीत ही कार सर्वाधिक उठावदार दिसते. मीडिया रिपोर्टनुसार, रोल्स रॉयस कलिनन कारच्या पेंटसाठी साधारणत: 1 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
मुकेश अंबानी यांनी नवीन कलिनन कारसाठी 0001 रजिस्ट्रेशन नंबर घेतला आहे. आरटीओेनुसार, जुन्या सिजीरमध्ये हा नंबर उपलब्ध नसल्याने मुकेश अंबानी यांनी एक नवीन सिजीरमधून रजिस्ट्रेशन नंबरची निवड केली आहे. यासाठी आरटीओने फक्त या रजिस्ट्रेशन नंबरसाठी 12 लाख रुपये घेतले आहेत. साधारणत: व्हीआयपी नंबर घेण्यासाठी 4 लाख रुपयांपर्यंत खर्च येत असतो.
दरम्यान, मुकेश अंबानी यांच्याकडे आधीचे देखील लग्झरी कार्सचे मोठे कलेक्शन आहेत. अंबानींच्या कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूपदेखील आहे. यासह अंबानी यांच्याकडे तीन रोल्स रॉयस कलिननशिवाय एक न्यू जनरेशन फँटम एक्सटेंडेड व्हीलबेसदेखील असून याची किंमत जवळपास 13 कोटी रुपये आहे.