BR Ambedkar Birth Anniversary 2023 : डॉ. बाबासाहेब यांची जयंती 14 एप्रिलला जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यांनी अस्पृशांना त्यांचे हक्क देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी सामाजिक आणि राजकीय निर्णय घेतल्याने आज आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक आहोत. स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व या तीन महत्वाच्या मुल्यांचा देशाची घटना लिहीताना विचार केला. हजारो वर्षांपासून अज्ञान आणि अंधारात आयुष्य जगणाऱ्या पददलितांना मानसिक आणि आर्थिक गुलामगिरी मुक्त केले. या महामानवाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचे आपल्यावर काय परिणाम झाले आहेत ते पाहूया…
1 ) भारतीय श्रम संमेलनाच्या 7 व्या सत्रात डॉ. बाबासाहेब यांनी कामाच्या तासांची संख्या 14 तासांवरून 8 तासांवर केली. जर ते नसते तर आपला कामाचे तास सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत असते.
2 ) साल 1955 मध्ये डॉ.आंबेडकर यांनी योग्य प्रशासन चालण्यासाठी मध्य प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचे विभाजन करण्याची शिफरस केली. त्यानंतर 45 वर्षांनी दोन राज्यांचे विभाजन झाले. ज्यामुळे पुढे झारखंड, छत्तीसगड ही छोटी राज्य निर्माण झाली.
3 ) साल 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना होण्यात आंबडेकर यांचे योगदान आणि दूरदृष्टी होती. त्यांनी ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी – ईट्स ओरिजिन एंड सॉल्यूशन’ या ग्रंथात आरबीआयच्या स्थापने संदर्भात सखोल विवेचन केले आहे.
4 ) डॉ. आंबेडकर यांनी भारतात विशाल धरणे बांधण्यासाठी तंत्रज्ञान यावे यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्यामुळे दामोदर, हिराकुंड आणि सोन नदी बंधारा प्रकल्पाची स्थापना झाली.
5 ) कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.
6 ) आंबेडकर यांनी 1935-36 दरम्यान लिहीलेल्या वेटींग फॉर व्हीसा या आत्मपर पुस्तकाचा कोलंबिया विद्यापीठात एका पाठ्यपुस्तक रूपात समावेश झाला.
7 ) आंबेडकर यांनी राष्ट्रीय रोजगार विनिमय एजन्सी स्थापन करण्यात पुढाकार केला. त्यामुळे त्यांच्या दृरदृष्टीचा आपल्याला अंदाज येतो.
8 ) बाबासाहेबांनी 1947 मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता
9 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जम्मू – कश्मीरला 370 कलमानूसार विशेष दर्जा देण्याच्या विरोधात होते.
10 ) बाबासाहेबांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.