Amit shah, Saurav Ganguly : अमित शहा सौरव गांगुलींच्या घरी जेवायला पोहोचले, ममता बॅनर्जी म्हणाल्या…त्यांना मिष्टी दही खाऊ घाला

| Updated on: May 06, 2022 | 11:34 PM

पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत.

Amit shah, Saurav Ganguly : अमित शहा सौरव गांगुलींच्या घरी जेवायला पोहोचले, ममता बॅनर्जी म्हणाल्या...त्यांना मिष्टी दही खाऊ घाला
अमित शहा सौरव गांगुलींच्या घरी जेवायला गेले.
Image Credit source: social
Follow us on

दिल्ली : पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) भाजप नेते सुवेंदू अधिकारी (suvendu adhiakri) आणि अमित मालवीय यांच्यासोबत सौरव गांगुलींच्या (Saurav Ganguly) घरी जेवायला गेले होते. अमित शहा बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरी शुक्रवारी भोजनासाठी गेल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलंय. सौरव गांगुलींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या ‘मुक्ती-मातृका’ सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट दिली कार्यक्रमात सौरव गांगुलींची पत्नी डोना गांगुली आणि त्यांच्या दीक्षा मंजरी यांनी नृत्य सादर केलं. यावेळी बोलताना गांगुली म्हणाले की, ‘मी त्यांना 2008 पासून ओळखतो. मी त्यांच्या मुलासोबत काम करतो. तो आमच्या घरी येतो आणि आमच्यासोबत जेवतो देखील. तो फक्त शाकाहारीच खातो,’ गांगुली यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

सुवेंदू अधिकारी आणि अमित मालवीयांची उपस्थिती

Union Home Minister Amit Shah met with BCCI chief Sourav Ganguly and had dinner with him at his residence in Kolkata, West Bengal pic.twitter.com/dCn3TkgsT1

— ANI (@ANI) May 6, 2022

राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

अमित शाह यांनी स्वतः सौरव गांगुलीच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर खाण्याची चर्चा झाली. दोन्ही पक्ष याला राजकीय बैठक म्हणत नाहीत. असे असतानाही भाजपला सौरव गांगुली यांना विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचे असल्याने राजकारणाच्या गोटात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

अमित शाह दोन दिवस बंगालमध्ये आहेत. त्यांनी जाहीर सभेत ममता सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याची टीका शहा यांनी केली याबाबत ममतांना प्रश्न विचारा. दुसरीकडे, कोलकाता येथील तृणमूल भवनमध्ये गांगुली आणि शाह यांच्या भेटीबाबत ममता बॅनर्जी यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, जर गृहमंत्र्यांना सौरवच्या घरी जायचे असेल तर अडचण कुठे आहे? मी सौरभला त्यांना मिष्टी दही खायला सांगेन.