अहमदाबाद : देशभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बेड्सची कमतरताही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यात आयसीयू (ICU) बेड्सचं प्रमाण तर खूप कमी पडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील बेड्सच्या उपलब्धतेवर बोलताना गुजरातमध्ये देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत अधिक आयसीयू बेड्स (ICU Beds) असल्याचा दावा केलाय. त्यांच्या या दाव्यावर चर्चेला उधाण आलंय (Amit Shah claim Gujrat has more ICU beds than any other state of India).
अमित शाह म्हणाले, “अहमदाबादमधील गुजरात युनिव्हर्सिटी कन्वेंशन सेंटरमध्ये राज्य सरकार, संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या मदतीने धन्वंतरी कोविड रुग्णालय सुरु होतंय. त्यात 900 ऑक्सिजन बेड, 250 आयसीयू बेड्स आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मी आज या रुग्णालयाची पाहणी केली. या रुग्णालयामुळे रुग्णांना मोठा फायदा होईल. गुजरातमध्ये देशातील इतर दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या तुलनेत अधिक आयसीयू बेड्स आहेत.”
गुजरात यूनिवर्सिटी कन्वेंशन सेंटर, अहमदाबाद में कल से शुरू हो रहे राज्य सरकार, रक्षा मंत्रालय व गृह मंत्रालय की सहायता से तैयार किए गए 900 ऑक्सीजन बेड व उच्च स्तरीय सुविधाओं से युक्त धन्वंतरी कोविड अस्पताल का निरीक्षण किया। इससे अहमदाबाद के कोरोना मरीजों को बहुत लाभ मिलेगा। pic.twitter.com/pJOPNlzU6G
— Amit Shah (@AmitShah) April 23, 2021
“आगामी काळात गांधीनगर येथील टाटा ट्रस्टच्या मदतीने 1200 बेड्सचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यात 600 आयसीयू बेड्स असणार आहेत,” अशीही माहिती अमित शाह यांनी दिली.
विरोधकांकडून गुजरातमधील आरोग्य सुविधांवर टीका
Happening right now: 108 ambulances with #Covid patients waiting for 4-6 hours outside #Ahmedabad Civil Hospital pic.twitter.com/Lhofium2Fo
— DP (@dpbhattaET) April 13, 2021
दरम्यान, याआधी विरोधकांनी गुजरातमधील आरोग्य सुविधांवरुन भाजपवर जोरदार टीका केली होती. जितेंद्र आव्हाड यांनी अहमदाबादमधील एक व्हिडीओ रिट्विट करत तेथील रुग्णाचे हाल होत असल्याचा आरोप केला होता.
हेही वाचा :
गुजरातच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम; नाना पटोले यांचा आरोप
व्हिडीओ पाहा :
Amit Shah claim Gujrat has more ICU beds than any other state of India