नवी दिल्लीः सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी बारामुल्ला येथे एका सभेत जोरदार हल्लाबोल केला. जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली.अमित शहा यांनी बोलताना ते म्हणाले की, या राजकीय नेत्यांनी राज्याच्या विकासात अडथळा आणल्याचा आरोपही करण्यात आला. अमित शहांच्या या भाषणाबरोबर सभेत बोलताना त्यांनी त्यांच्याभोवती लावण्यात आलेले बुलेट प्रूफ ग्लास (Bullet proof glass) त्यांच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यामुळे त्यांच्या सभेतील भाषणाबरोबरच हा मुद्दाही चर्चेचा ठरला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्टेजवरील बुलेट प्रूफ काच अधिकारी हटवताना दिसत आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी शेअर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये स्टेजवर असलेल्या आणि संरक्षण म्हणून बुलेट प्रूफ काच लावण्यात आली आहे. मात्र अमित शहा कार्यक्रमस्थळी येण्याआधीच अधिकाऱ्यांनी ती बुलेट प्रूफ काच काढून टाकली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह या घटनेबद्दल म्हणतात की, बारामुल्ला येथील मेळाव्याला संबोधित करण्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा बुलेट प्रूफ काच काढण्यास सांगितली. त्यानंतर त्यांनी विरोधकांसह दहशतवादावर जोरदार हल्ला चढवला.
फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी स्थापन केलेली ‘गुप्कर आघाडी’ म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील सहा प्रादेशिक पक्षांची राजकीय आघाडी आहे.
ही आघाडी जम्मू-काश्मीरला कलम 370 आणि राज्याचा दर्जा बहाल करू इच्छित असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांना पाकिस्तानींसाठी “रेड कार्पेट” घालायचे अशी जोरदार टीकाही त्यांच्यावर करण्यात आली आहे.
‘गुप्कर मॉडेल’ने जम्मू काश्मीरमधील तरुणांना फक्त हातात दगड, बंद शाळा, महाविद्यालये आणि हातात गन दिल्या असल्याची टीका केली आहे.
या सभेत अमित शहा यांनी सांगितले की, सध्या तुमच्यासमोर दोन मॉडेल्स आहेत. पीएम नरेंद्र मोदींचे मॉडेल रोजगार, शांतता आणि बंधुता प्रदान करण्याविषयी बोलते, तर दुसरे गुप्कर मॉडेल आहे. त्यांच्यामुळेच पुलवामा हल्ला झाला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुलवामामध्ये 2000 कोटी रुपये खर्चून रुग्णालय बांधले गेले.
एकीकडे गुप्कर मॉडेल देशात पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी रेड कार्पेट घालत आहे, तर दुसरीकडे मोदी मॉडेल तरुणांना रोजगार देण्यासाठी 56,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे सांगण्यात आले आहे.